शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगर शहराला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

लँडमाफियांनी मोक्याच्या आणि मिळेल त्याठिकाणी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काहींनी खोट्या सनदी काढल्या आहेत.

बाबासाहेब नेर्ले -गांधीनगर -पश्चिम महाराष्ट्रात तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेल्या गांधीनगरला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असलेल्या या बाजारपेठेत लँडमाफियांनी तसेच अनेकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. ही बाब माहीत असूनही ‘गांधारी’ची भूमिका शासन का घेत आहे? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, चिंचवाड या पाचही गावांच्या हद्दीत ही व्यापारपेठ वसली आहे. येथील व्यापारीकरण पाहता येथील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येथे काही लँडमाफियांनी मोक्याच्या आणि मिळेल त्याठिकाणी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काहींनी खोट्या सनदी काढल्या आहेत. तसेच काही आरक्षित शासनाच्या जागा आहेत त्याही गिळंकृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांधीनगर मुख्य रस्ता तर अतिक्रमितच आहे. वास्तविक ६० फुटांचा रस्ता असतानाही तो आता ३० फुटांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे निम्म्या रस्त्यावरच अतिक्रमण झाले आहे. सिंधी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी रोडच व्यापला आहे. त्यांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा देऊनही ते मोक्याच्या ठिकाणीच ठाण मांडून बसले आहेत. परिणामी, गांधीनगरचे एकंदरीत अस्तित्वच धोक्यात आले आहे; पण याचे सोयरसूतक शासनास नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे फावते आहे. गांधीनगरच्या अतिक्रमण प्रश्नाविषयी दलित संघटना, शिवसेनेचे आंदोलनही झाले. पण, त्या आंदोलनाची धार तात्पुरती राहिली. काही संघटनांची निवेदने धूळ खात पडली आहेत. तर काहींना केराची टोपली दाखविली आहे.एकंदरीत गांधीनगरचे अस्तित्व टिकवावयाचे असेल, तर येथील शासकीय आरक्षित जागांचे तसेच अनधिकृत बांधकामे थांबविण्याचे मोठे आवाहन संबंधित विभागाला असणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे.