शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात काम करणे उत्साहवर्धक

By admin | Updated: May 31, 2016 01:19 IST

निरोप समारंभ : बदली झालेल्या न्यायाधीशांच्या भावना; असोसिएशनतर्फे सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात काम करणे अत्यंत उत्साहवर्धक तसेच कायद्याच्या नवनवीन तरतुदींची माहिती मिळणे, अशा स्वरूपाचा कार्यकाल मिळाल्याबद्दल बदली झालेल्या न्यायाधीशांनी कोल्हापुरात समाधान व्यक्त केले. सोमवारी जिल्हा बार असोसिएशनतर्फे येथील न्यायसंकुलाच्या एका हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अवचट होते.कोल्हापूर जिल्हा न्यायालयामधील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील, एम. बी. तिडके यांची अनुक्रमे अहमदनगर (श्रीरामपूर) व सिंधुदुर्ग (ओरोस) या ठिकाणी बदली झाली. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे व एस. ओ. पांडे यांची बीड (केज) व ठाणे (उल्हासनगर) या ठिकाणी बदली झाली आहे.बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी प्रास्ताविक केले. मोरे यांनी इमारतीमधील गैरसोयीबद्दल तसेच पक्षकार व वकिलांना असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास अवचट यांनी लवकरच तोडगा काढून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. सेक्रेटरी एस. एस. खोत यांनी जलद व सुलभ न्यायदान होण्यासाठी बार व बेंचमध्ये सशक्त वातावरण असणे आवश्यक असते. अशा कार्यक्रमांमुळे पक्षकारांना सुलभ व वेळेत न्याय मिळणे शक्य होते, असे सांगितले. सचिव अ‍ॅड. एस. एस. खोत यांनी सूत्रसंचालन केले.समारंभास माजी अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. एन. घाटगे, सहसचिव अ‍ॅड. अंशुमन कोरे, लोकल आॅडिटर अ‍ॅड. प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. मेघा पाटील, सदस्य मिथुन भोसले, शहाजी पाटील, धैर्यशील पवार, संदीप चौगुले, अनुजा देशमुख, गुरुनाथ हारगे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्हा न्यायालयातून बदली झालेल्या न्यायाधीशांच्या निरोप समारंभात बोलताना न्यायाधीश आर. डी. पाटील. यावेळी न्यायाधीश सुनील वेदपाठक, अ‍ॅड. अरुण पाटील, अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे, न्यायाधीश अवचट, न्यायाधीश एम. बी. तिडके, अ‍ॅड. दिलीप मंगसुळे उपस्थित होते.