शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हेदवडे-गिरगाव पुलाच्या चारी बाजूचा भराव खचू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हेदवडे-गिरगावदरम्यानच्या पुलाचा भराव खचल्याने सुमारे एक कोटी ६६ लाखांचा निधी पाण्यात खचून जाण्याचा धोका ...

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हेदवडे-गिरगावदरम्यानच्या पुलाचा भराव खचल्याने सुमारे एक कोटी ६६ लाखांचा निधी पाण्यात खचून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव खचल्यामुळे वाहतुकीस प्रचंड धोका निर्माण झाला आहे. कांही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या व उद्‌घाटनापूर्वीच पुलाशेजारील भराव खचल्याने पुलाच्या कामाबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या हेकेखोर व अरेरावीमुळे परिसरातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मोरओहोळवरील हेदवडे-गिरगावदरम्यान जुना पूल होता. तो लहान असल्याने वाहतुकीस धोकादायक होता. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत होती. या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीचा विचार करून तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने या पुलास 'नाबार्ड' मधून १ कोटी ६६ लाखाचा निधी मंजूर झाला. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पूल उभारला. पण पुलाशेजारील दोन्ही बाजूस दहा फुटांचा भराव खचू लागला आहे. ठेकेदाराने भरावाचे काम निकृष्ट केल्यामुळे भरावा पहिल्याच वळीव पावसात २५ ते ३० फूट लांब खचून चारी बाजूस भराव निखळू लागला आहे. डांबरीकरण केलेल्या पुलाच्या चारी बाजूच्या भरावाला मोठ्‌या भेगा पडल्या आहेत. खचलेल्या भेगा दिसू नयेत म्हणून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ठेकेदाराने रस्त्यात खडी ओतली आहे. भराव खचल्याने हेदवडे-गिरगाव खोरीला होणार्‍या वाहतुकीला प्रचंड धोका निर्माण झाला आहे.

फोटो

हेदवडे येथील पुलाशेजारील भराव खचल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे.