शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

अकरा वर्षे महामंडळास नाही कुणीच वाली

By admin | Updated: October 26, 2016 00:52 IST

संचालक मंडळ बरखास्त : भाजप सरकारकडूनही बेदखल

विश्वास पाटील -- कोल्हापूर--अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ २००५ ला विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बरखास्त केले. त्यानंतर या महामंडळावर संचालक मंडळ नाही. त्यामुळे महामंडळाचे नक्की काम कसे चालते, त्याच्या अडचणी काय आहेत, हे पाहायला कुणाला सवडच नाही. त्यामुळे सगळा कारभार ‘मागील पानांवरून पुढे’ या धाटणीने सुरू आहे.या महामंडळाच्या स्थापनेचीही गोष्ट सुरस आहे. राज्यात १९९५ च्या दरम्यान शिवसेना-भाजपचे जोरात वारे वाहत असताना त्यावेळी माथाडी कामगार नेते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत युतीला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाटील यांच्याशी अत्यंत मैत्रीचे संबंध; त्यामुळे युतीची सत्ता आल्यावर महासंघाला काहीतरी लाभाचे पद द्यायला हवे, असा विचार सुरू झाला. त्यातून १९९८ ला या महामंडळाची स्थापना झाली व महासंघाचेच नेते नांदेडचे किशनराव वरखिंडे यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले. महासंघाचे दुसरे नेते विनायक मेटे यांना आमदार केले. महासंघाच्या नेत्याला लाल दिवा देण्याचा शब्द युतीने दिला होता, त्याची पूर्तता म्हणून या महामंडळाची स्थापना झाली व त्यातून नेत्यांना लाल दिवा - आमदारकी मिळाली; परंतु त्याचा मराठा समाजाला फारसा काही लाभ झाला नाही. मेटे हे स्वत:ला या समाजाचे स्वयंघोषित नेते समजत असले तरी त्यांनीही या महामंडळाच्या कारभाराकडे कधी सरकारचे लक्ष वेधल्याचे ऐकिवात नाही. युतीने महामंडळाची स्थापना केली; परंतु ते अस्तित्वात येऊन काम सुरू करीपर्यंत त्यांची सत्ता गेली. सत्तांतरानंतर तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने २००२ ला या महामंडळावर संचालक मंडळ नियुक्त केले व सांगलीचे सध्याचे भाजपचे खासदार असलेले संजयकाका पाटील यांना अध्यक्ष केले. त्यावेळी अंकुश पाटील (लातूर), वैशाली नागोरे (पुणे),अविनाश कदम (नांदेड), भारती पाटील (मुंबई, अण्णासाहेब पाटील यांची कन्या), विजय भोसले (सोलापूर) यांचे संचालक मंडळ नियुक्त केले. पुन्हा २००५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सगळीच महामंडळे बरखास्त केली. पुढे १ जून २००६ ला बुलढाण्याचे अ‍ॅड. गणेश पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. आताही भाजपचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली तरी महामंडळास अध्यक्ष नाही. सकल मराठा समाजाने मोर्चे काढल्यानंतरच या महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला.याबद्दल माजी संचालक अविनाश कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘राज्य सरकार महामंडळास पुरेसा निधी देत नाही; त्यामुळे कर्जवाटप करताना अडचणी येत होत्या. बीजभांडवल योजनेत पूर्वी महामंडळ २५ टक्के रक्कमच देत असे. आम्ही भांडून ही रक्कम वाढविण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ती ३५ टक्के करण्यात आली. पाच लाखांचे कर्ज असेल तर महामंडळ त्यास १ लाख ७५ हजार रुपये देते; परंतु त्यावरही ते चार टक्के व्याज आकारणी करते. त्याऐवजी महामंडळानेच किमान एक लाख रुपये तरी या कर्ज योजनेतून बिनव्याजी द्यायला हवेत, असे आमचे म्हणणे होते; परंतु सरकार त्यास तयार झाले नाही. ही अट अजूनही कायम आहे.’मराठा नव्हे... आर्थिक दुर्बल...युतीच्या शासनाने हे महामंडळ स्थापन करताना ते मराठा समाजातील आर्थिक मागास घटकांसाठीच म्हणून स्थापन केले; परंतु एकाच खुल्या जातीतील लोकांसाठी अशी सोय केली असे होऊ नये म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महामंडळ असे त्याचे स्वरूप ठेवले.अण्णासाहेब पाटीलमहामंडळ