शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील ३५ संस्थांच्या निवडणुका

By admin | Updated: December 16, 2014 23:52 IST

‘क’ वर्गातील संस्थां : काही संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू

कागल : कागल तालुक्यातील ‘क’ वर्गातील ३५ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून, काही संस्थांची निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामध्ये सेवासंस्था, पतसंस्था, औद्योगिक ग्राहक आणि पाणीपुरवठा संस्थांचा समावेश आहे. याबद्दलची माहिती संबंधित संस्था आणि येथील सहायक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे.३१/३/२०१३ पर्यंतच्या पात्रता तारखेपर्यंतच्या या संस्था आहेत. त्यामध्ये सर्वच ३५ संस्थांच्या निवडणुका एकदम होणार नाहीत. त्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. करनूर (ता. कागल) येथील शेतकरी विकास सेवा संस्था, शाहू विकास सेवा संस्था केनवडे, स्वामी समर्थ शेंडूर या सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे. २२ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३१ डिसेंबर २०१४ ते १५/१/२०१५ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे, तर २४ जानेवारीला मतदान अशा तारखा आहेत.निवडणूक कार्यक्रमासाठी सज्ज झालेल्या आणि काहींची निवडणूक लागलेल्या संस्था पुढीलप्रमाणे :- दत्त विकास जैन्याळ, दत्तपंत लिंगनूर कापशी, विठ्ठल रखुमाई कासारी, राम विकास संस्था बाळिक्रे, विठ्ठल अवचितवाडी, सदाशिवराव मंडलिक हळदी, नवनाथ आणूर, भावेश्वरी पतसंस्था बिद्री, प्रथमेश पतसंस्था कसबा सांगाव, साईनाथ पतसंस्था वाळवे खुर्द, वेदगंगा पतसंस्था मळगे खुर्द, कागल तालुका शिक्षक पतसंस्था, मंडलिक साखर कारखाना कामगा पतसंस्था, कागल नगरपालिका नोकर पतसंस्था, दूधगंगा ग्राहक सांगाव, इंदिरा महिला मुरगूड, दत्त ग्राहक सांगाव, रत्नछाया पाणी पुरवठा कसबा सांगाव, जगदंबा पाणी पुरवठा मांगनूर, सर पिराजीराव गूळ उत्पादक संस्था मुरगूड, आदींचा यामध्ये समावेश आहे.बिनविरोधसाठी हालचाली प्रामुख्याने विकास आणि पतसंस्था बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी मंडळीकडून आता हालचाली सुरू आहेत. एकमताने बिनविरोध झाली, तर चांगलेच आहे; पण निवडणूक कार्यक्रमच गुपचुपपणे उरकून संस्था बिनविरोध करून घेण्याचे प्रकार कागल तालुक्यात नवीन नाहीत. यासाठी संस्थेच्या सभासदांनी जागरूक राहून निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे.