शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदाची निवड १२ एप्रिलला

By admin | Updated: March 5, 2015 00:14 IST

‘राष्ट्रवादी’ची पक्षांतर्गत निवडणूक : ग्रामीणमधून सुमारे १२ हजार सभासदांची नोंदणी

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्हाध्यक्षपदाची निवड १२ एप्रिलला होणार आहे. २२ मार्चला बूथ कमिट्या पदाधिकारी निवडीपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने जिल्हा परिषद, तालुका व विधानसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांची निवडी होणार आहेत. गेले दोन महिने तालुका पातळीवर प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यांतून सभासदांची नोंदणी अखेरच्या टप्प्यात असून, शुक्रवारी (दि. ६) प्राथमिक व क्रियाशील सभासदांची यादी जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. ८ मार्चला सभासदांची प्रारूप यादी तयार करण्यात येणार असून, ११ मार्चपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. १७ मार्चपर्यंत हरकतींवर निकाल देण्यात येणार असून, १८ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २२ मार्चपासून बुथ कमिट्यांच्या निवडीची प्र्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. ५ एप्रिलला विधानसभा व तालुकाकार्यकारिणी, जिल्हा व प्रदेश प्रतिनिधींची निवडी केल्या जाणार आहेत. १२ एप्रिलला जिल्हाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. १९ एप्रिलला मुंबई अध्यक्ष, तर २६ एप्रिलला प्रांताध्यक्षांची निवड केली जाणार आहे. ग्रामीण भागातून सुमारे १२ हजार सभासद नोंदणी झाली आहे. भिलारेंऐवजी  दिलीप पाटील प्रदेश पातळीवरून पक्षातंर्गत निवडणुकीसाठी बाळासाहेब भिलारे यांची नियुक्ती केली होती. पण, त्यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी नकार दिला होता, त्यांच्याऐवजी दिलीप पाटील (सांगली) यांची बुधवारी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. प्रदेश पातळीवरून पक्षांतर्गत दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार प्रक्रिया राबविली जात आहे. पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदेश पातळीवरून जबाबदार व्यक्तीला पाठविले जाते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. - अनिल साळोखे,जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी