शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

आठ पोलिसांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 14, 2015 00:48 IST

उच्च न्यायालय : सर्व पोलीस 'करवीर'मधील; चोरीचे हस्तगत साहित्य देताना पैशांची मागणी

कोल्हापूर : करवीर पोलीस ठाण्यामधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा न करता मोबाईल शॉपीमधील साहित्य हस्तगत करून परत न देणे, ते परत देण्यास हजारो रुपयांची लाच मागणे, अशा गंभीर आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे व अनुजा प्रभुदेसाई यांनी हा आदेश तौसिफ खलील शेख या तरुणाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये २ फेब्रुवारीस दिला. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत भावके यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.जुना बुधवार पेठ येथील तौसिफ खलील शेख या तरुणाची कॉम्प्युटर व मोबाईल शॉपी आहे. पाडळीतील सुजित शेलार यांनी त्यांची दुचाकी चोरी झाल्याबाबत करवीर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून ओंकार विभूते या संशयितास पोलिसांनी अटक केली. विभूतेने मोबाईलचे आय.एम.ई.आय. नंबर काढून देण्याचे काम तौसिफ शेख करून देतो असे सांगितले. हे कारण देऊनही मूळ दुचाकी चोरीची तक्रार बाजूला ठेवून शेख याला पोलिसांनी अटक केली. शेखच्या मोबाईल शॉपीमधील बऱ्याचशा वस्तू पंचनामा न करता १४ मार्च २०१४ ला ताब्यात घेऊन त्यास पोलिसांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिसांविरुद्ध कोणतेही तक्रार नसल्याचे न्यायालयास सांगण्याची धमकी दिली. जर या तरुणाने काही तक्रार केली तर त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या तरुणांविरुद्ध सबळ पुरावा नसतानादेखील वृत्तपत्रांमध्ये बातम्या देऊन त्याला बदनाम केले. या तरुणाला दुसऱ्या दिवशी न्यायालयाने जामीन मंजूर केला. तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन व्यवसायाच्या साहित्याची मागणी केली; परंतु ते परत दिले नाही. उलट सायबर गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन पोलिसांनी २४ हजार रुपये घेतले. त्यानंतर शेखवरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य न आढळल्याने पोलिसांनी न्यायालयात कलम १६९ अन्वये अहवाल सादर करून प्रकरण न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले. त्यानंतरही वस्तू परत दिल्या नाहीत. त्यामुळे शेख याने अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात रिट दाखल केली. (प्रतिनिधी)पोलिसांची नावे विजय गुरखे, सागर कांडगावे, बबलू शिंदे, संजय पडवळ, बाबूराव घोरपडे, प्रशांत घोलप, प्रथमेश पाटील, कुमार पोतदार.मला आदेशाची प्रत मिळालेली नाही. परंतु, उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला असेल तर त्याप्रमाणे करवीर पोलीस ठाण्यामधील पोलिसांची चौकशी केली जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा,जिल्हा पोलीस अधीक्षक.