शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेखच्या लिपिकाला शिक्षा

By admin | Updated: June 26, 2015 00:55 IST

पन्हाळा कार्यालय : चार हजारांची लाच प्रकरण

कोल्हापूर : शेतजमिनीच्या मोजणीसाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने भूमी अभिलेख पन्हाळा कार्यालयातील लिपिक राजेंद्र केशवराव बिडकर (वय ४१) याला एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड तसेच कलम सातखाली सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी गुरुवारी सुनावली. दरम्यान, बिडकर याने दंडाची रक्कम भरून वकिलातर्फे जामीन दिल्याने न्यायालयाने त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.अधिक माहिती अशी, अरविंद रघुनाथ पाटील (रा. फुलेवाडी) यांची वडिलोपार्जित चार गुंठे जमीन पन्हाळा येथे आहे. त्यामध्ये त्यांनी सागवान व निलगिरीची झाडे लावली आहेत. त्यांच्याशेजारी संजय शामराव पाटील यांचीही चार गुंठे जमीन आहे. या जमिनीची संजय पाटील यांनी २२ एप्रिल २००६ रोजी बिडकर याच्याकडून मोजणी करून घेतली होती. त्यावेळी बिडकर याने अरविंद यांच्या भावास ‘तुम्ही संजय पाटील यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे; त्यामुळे त्यांच्या जागेतील झाडांवर तुमचा कोणताही अधिकार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे अरविंद यांनी मोजणी चुकीची असल्याने पुन्हा करण्यासाठी तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, पन्हाळा यांच्याकडे २५ एप्रिल २००६ रोजी अर्ज सादर केला. त्यानंतर मोजणीची चौकशी करण्यासाठी ते गेले असता बिडकर याने मोजणी बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर १७ मे २००६ रोजी बिडकर याने फोनवरून पाटील यांना वाघबीळ येथे बोलावून मोजणी पहिल्यासारखीच ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. पाटील यांनी या प्रकरणी लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एच. बी. वाकडे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने २३ मे २००६ रोजी पाटील यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना बिडकर याला रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक वाकडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकारतर्फे वकील दिलीप मंगसुळे यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)