शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदंडाधिकाऱ्यांमुळे शिक्षा

By admin | Updated: January 17, 2016 00:57 IST

इचलकरंजीतील प्रकरण : १२ साक्षीदार फितूर, बलात्काऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

इचलकरंजी : १२ साक्षीदार फितूर होऊनही न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा जबाब ग्राह्य मानून येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आजिम बाळासो मुल्ला (वय २४, रा. जवाहरनगर) याला दोषी ठरविले. अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश आर. अस्मर यांनी शनिवारी मुल्ला याला दहा वर्षे सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे पीडित मुलगी व तिची आई या दोघींही फितूर झाल्या होत्या. जवाहरनगर येथील हनुमाननगर परिसरात आजिम मुल्ला विवाहित असून, त्याला दोन अपत्ये आहेत. तो २०१३ मध्ये परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावीत होता व घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करीत होता. या संदर्भात कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही देत होता. हा प्रकार ९ जून २०१३ रोजी उघडकीस आला. आजिम हा दोन महिने तिच्यावर बलात्कार करीत होता. शिवाजीनगर पोलिसांत या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आजिम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावरील दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. त्या दोषारोपपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली, तेव्हा त्यात तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अर्चना बोदडे यांच्यासह १७ साक्षीदार तपासले. यापैकी फिर्यादी (मुलीची आई), पीडित मुलगी यांच्यासह १२ साक्षीदार फितूर झाले. तरीही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. निंबाळकर यांच्यासमोर सीआरपीसी १६४ नुसार पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला होता. हा जबाब व निंबाळकर यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आजिम मुल्ला यास बलात्कार तसेच अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (६) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच ५० हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास एक वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पाहिले. (वार्ताहर)