शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक होळी करणार

By admin | Updated: March 4, 2015 23:37 IST

बच्चे कंपनीत उत्साह : होळी लहान, पोळी दानचे आवाहन

कोल्हापूर : उन्हाळ््याची चाहूल देणारा होळी सण आज, गुरुवारी सर्वत्र साजरा होत आहे...पण होळीच्या आदल्या दिवशीच बच्चेकंपनीने टिमकी आणि ताशांचा कडकडाट सुरू केल्याने उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टिमकी, ताशांची विक्री केली जात आहे. निसर्गप्रेमी संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रतीकात्मक होळी साजरी करत होळी लहान आणि पोळी दान करण्याचे आवाहन केले आहे. वाईट गोष्टींचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणाऱ्या होळीला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. गेल्या काही वर्षांत होळीच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी व निसर्गप्रेमी संस्थांनी नागरिकांना प्रतीकात्मक होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील तरुण मंडळांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान करण्याचा उपक्रम राबवला जातो. यंदा श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या विद्यमाने होळीनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला ६१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत. अंबाबाई मंदिराबाहेरील संत गाडगे महाराज चौकात सकाळी ११ वाजता या शेणी महापालिके च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येतील. शिवाजी पेठेतील वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळाच्यावतीने दुपारी साडेबारा वाजता पंचगंगा स्मशानभूमीस ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)स्वाईन फ्ल्यूशी लढा सध्या सगळीकडे स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्ल्यूचे विषाणू धूप किंवा धूर असलेल्या ठिकाणी जगत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने होळीत किमान पाच कापूर टाकावेत त्यामुळे वातावरण शुद्ध होऊन स्वाईन फ्ल्यूूला आळा घालण्यास मोलाची मदत मिळेल, असे आवाहनही व्हॉटस् अ‍ॅपवर केले जात आहे.होळीच्या आकारावर कुणाचाही प्रतिष्ठा ठरत नसते, पण मोठ्या होळीने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अगदी एका शेणीतसुद्धा प्रतीकात्मक होळी साजरी करता येते. होळीत लाकूड, टायर किंवा प्लास्टिकसारख्या वस्तू जाळू नका, त्यामुळे प्रदूषण वाढते. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ