शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी

By admin | Updated: March 11, 2017 16:40 IST

होळीची शेणी स्मशानभूमीला दान

कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळीहोळीची शेणी स्मशानभूमीला दान कोल्हापूर : होळी सणानिमित्त कोल्हापूर शहरातील विविध मंडळांनी यंदाही उत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देत होळीची शेणी स्मशानभूमीला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून संयुक्त उपनगर समितीतर्फे सव्वा लाख शेणी, तर वांगी बोळमधील अचानक तरुण मंडळातर्फे ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत.महापालिकेतर्फे पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमी येथे मोफत अंत्यसंस्काराची सुविधा आहे. दरम्यान, मोफत अंत्यसंस्कार सुविधेसाठी शेणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विविध संस्थांनी घेतला आहे. मोठ्या प्रमाणात होळी साजरी केल्याने वायू प्रदूषण होते तसेच रस्ते खराब होतात. हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे अचानक तरुण मंडळाने म्हटले आहे. अचानक तरुण मंडळातर्फे गेली १५ वर्षे शेणी दान उपक्रम सुरू आहे. मंडळाचा यावर्षी ५१ हजार शेणी दान करण्याचा संकल्प आहे. उपनगरातील कार्यकर्ते, मंडळांनी एकत्र येत संयुक्त उपनगर उत्सव समिती स्थापन केली आहे. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने एक लाख शेणी जमविण्याचा संकल्प केला. शुक्रवारअखेर एक लाख २५ हजार शेणी जमा झाल्या आहेत. वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी 'अवनि'ची पोळी दानची सादअवनि संस्थेमार्फत कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथे वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी आनंद शाळा चालविल्या जातात. दरवर्षी जवळपास ११०० मुले आनंद शाळेत शिकतात. या मुलांसाठी होळीची पोळी दान करण्याचे आवाहन अवनि संस्थेने केले आहे. संकलित केलेल्या पोळ्या कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर वीटभट्टीवरील आनंद शाळेतील मुलांना वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, शाळा व दानशूर व्यक्तींनी होळीची पोळी दान करावे. अवनि संस्था, जीवबा नाना जाधव पार्क, पुईखडी तसेच एकटी संस्था संचलित धागा रात्र निवारा रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, लक्ष्मीपुरी येथे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. मोठी होळी केल्याने शहरातील डांबरी रस्ते खराब होऊन पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. शहरातील तरुण मंडळे, तालीम संस्था, सेवाभावी संस्थांनी होळी लहान करुन जास्तीत जास्त शेणी महापालिकेच्या स्मशानभूमीस दान करावे, दान केलेल्या शेणी महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमी येथे स्वीकारल्या जातील, असे आवाहन महापालिकेने शहरातील सर्व संस्थांना केले आहे.