शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

ई-कचऱ्याबाबत जागरुकता गरजेची

By admin | Updated: January 14, 2016 00:21 IST

अश्विनी रामाणे : रोटरी क्लब आॅफ करवीर व चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’

कोल्हापूर : आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणांचा वापर वाढला आहे; पण त्या खराब झाल्यानंतर आपण सर्वजण नेहमीच्या ओल्या कचऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा टाकून देतो. त्यामुळे मानवी शरीरारवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सर्व समाजाने ई-कचऱ्याबाबत स्वयंस्फूर्तीने जागरूक व्हावे, असे प्रतिपादन महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवारी सकाळी संत गाडगेबाबा पुतळा, जोतिबा रोड येथे आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे होते. रामाणे म्हणाल्या, आधुनिक जीवनशैलीमुळे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती व खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही कालावधीनंतर या वस्तू खराब होतात. मग आपण सर्वजण हा कचरा नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. या वस्तूंचे कचऱ्यात विघटन होत नसल्याने त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनी या ई-कचरा संकलन अभियानात सहभागी होऊन शहराला प्रदूषणमुक्त करावे. रोटरी क्लब आॅफ करवीरचा हा उपक्रम स्तुत्य आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे म्हणाले, मोबाईल, टी.व्ही., विविध घरगुती वापरांकरिता लागणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. पण, ती खराब झाल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावणे अवघड होते. हा ई-कचरा नेहमीच्या कचऱ्यात सहज मिसळत नाही. त्याचे विघटन होत नाही. म्हणून हा ई-कचरा नेहमीप्रमाणे कचऱ्यात न टाकता तो पुरून नष्ट करावा. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक असा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे अशा कचऱ्याचे संकलन करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ई-कचरा अभियान अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी संकल्पना स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी जयंत कदम, रोटरी क्लब आॅफ करवीरचे निशिकांत नलवडे, शंकर शिंदे, हरिश पटेल, मच्छिंद्र चौगुले, प्रमोद चौगुले, मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव यांच्यासह इंदुमती गर्ल्स हायस्कूल व इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.