शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

धरणे आंदोलन : अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी

कोल्हापूर : सायबर चौकाजवळील डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यामुळे बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अतिक्रमण काढून डवरी समाजाला जागेचा ताबा देणे शक्य होण्याची चिन्हे नाही. त्यामुळे अकरा कुटुंबीयांसमवेत सुरू असलेले बेमुदत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अतिक्रमण हटवून जागेचा ताबा दिल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केलेल्या डवरी समाजातील १०० हून अधिक कुटुंबांनी आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला आहे. गेले दहा दिवस ही सर्व कुटुंबे येथे ठिय्या मारून आहेत. बहुजन परिवर्तन पक्षप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. या धरणे आंदोलनाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्याशी चर्चा करून १२ फेब्रुवारीला या जागेतील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी चव्हाण तसेच खरमाटे यांची या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे, त्या सातजणांपैकी चारजणांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळविली असल्याची बाब समोर आली. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल, असे डॉ. खरमाटे यांनी सांगितले. सायबर चौकाजवळील सर्व्हे क्रमांक ४८७ ब येथील अठरा गुंठे जागा यशवंतनगर गृहनिर्माण संस्थेला सरकारने दिली आहे. त्यावेळी त्या जागेवर काही लोकांनी आधीच अतिक्रमण केले होते. ही जागा मोकळी करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १९८७ मध्ये दिले होते; परंतु तेव्हापासून कोणीही दखल घेतली नाही. परंतु, आता समाजालाच तेथून उठविण्याचा घाट घातला जात असल्याची आंदोलकांची तक्रार आहे.