शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 11, 2017 00:54 IST

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अद्याप नसले तरी सांगली व सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यात मात्र हे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक आढाव्यानुसार सांगली व सातारा जिल्ह्णांत सुमारे ३६०० हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बळिराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्णात यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पेरणीस गती आली; पण ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी उगवणी झाल्या नव्हत्या. ‘आर्द्रा’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने या काळात काही भागातील प्रलंबित पेरण्या पूर्ण झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार हेक्टरवर (५७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यातील भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या असून भाताच्या १ लाख ८ हजारपैकी ६० हजार हेक्टर तर नागलीच्या २१ हजारांपैकी केवळ १५०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी दुबार पेरणीसारखे संकट येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व व त्यानंतरच्या काळात पाऊस जोरदार झाल्याने मशागत लवकर सुरू होऊन गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांना गती मिळाली. २ लाख ७८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर (४७ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ दिवसांत २९३ मिलीमीटर (५० टक्के) पाऊस झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली आहे. महाबळेश्वरमुळे जिल्ह्याची पावसाची टक्केवारी वाढत असली तरी यंदा विशेषत: माण, खटाव, कोरेगावचा दुष्काळी पट्टा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा कमीच पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत पण गेले दहा दिवस आकाश कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. माण, खटाव तालुक्यात खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र येथे जास्त असून पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. ज्या पिकांची उगवण झाली ती पाण्याअभावी करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे आहे. सांगली जिल्ह्यात यंदा २ लाख ९१ हजारांपैकी १ लाख २९ हजार हेक्टरवर (४४ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. ‘आर्द्रा’ नक्षत्र काळात शिराळा, वाळवा, मिरज, जत, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची उगवणही झाली. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दहा दिवसांत १०५ मिलीमीटर (२७ टक्के) पाऊस झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच तालुक्यांतील पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून पलूस, तासगांव , आटपाडी ,खानापूर,कडेगाव तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. एकंदरीत पावसाने हुलकावणी दिल्याने तिन्ही जिल्ह्णांतील पिकांचा जीव गळ्यापर्यंत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्णात दुबार पेरणीचे अद्याप संकट नसले तरी भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत. सांगली व सातारा जिल्ह्णांत मात्र दुबार पेरणीचे संकट दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तिन्ही जिल्ह्णांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सध्यातरी पुरेशा असल्याने पाणीटंचाईचे संकट फारसे दिसत नाही. उसावर किडीचा प्रादुर्भाव!कोल्हापूर विभागात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून ३ लाख ४ हजार हेक्टरवर ऊस आहे. अद्याप पाऊस चांगला असल्याने पिके जोमात असली तरी उघडिपीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीस पोषक असे वातावरण असल्याने माव्यासह तांबेऱ्याने उसाची पाने भरली आहेत. जिल्हा पेरणी हेक्टर पाऊस मिलीमीटर कोल्हापूर १ लाख ५१ हजार ३५०.९सांगली १ लाख २९ हजार १०५.६सातारा १ लाख ३२ हजार २९३.०