शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेतीचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत. ...

गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत.

मार्च अखेरीस व मेच्या पहिल्या आठवड्यात असे दुसऱ्यांदा ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असताना वारणा नदीतील पाणीपातळी खालावून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंप उघडे पडले असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. साहजिकच शेतीस पाणी पुरवठा लांबल्याने जवळपास पंधरा दिवस पाण्याचा फेर लांबणार आहेत. याचा फटका माळभागच्या व मोठ्या पाणीपुरवठा योजनेखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी भीती व्यक्त करीत असून, धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त असूनसुद्धा पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत कोडोली येथील वारणा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता धरणक्षेत्राजवळील पाॅवरहाऊसमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी पाणी सोडणे थांबविण्यात आले होते. एक-दोन दिवसांत पाणीपातळी पूर्ववत होईल असे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले.

धरण क्षेत्रात पाणी साठा असतानाही केवळ पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने याविरोधात वरिष्ठांच्या दाद मागण्याचा इशारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील (किणीकर) यांनी दिला आहे.

..... फोटो ओळी. ऐन उन्हाळ्यात वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे विद्युत मोटार पंप उघडे पडले आहेत.