शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

By admin | Updated: August 10, 2015 21:11 IST

आमजाई व्हरवडे येथील कुटुंब : वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या अपंगत्वाचे ओझे अंगावर घेऊन हाकत आहेत संसाराचा गाडा

शिरोळ तालुका : दानोळी, उमळवाड, उदगावात स्वतंत्र पद भरण्याची गरजजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या गावात गेल्या दहा वर्षांपासून पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. कोथळी येथील एका पोलीसपाटलावर ६० हजार लोकसंख्येचा ताण असून दानोळी, उदगांव, उमळवाड गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील दानोळी, उदगांव, उमळवाड, कोथळी या चार गावांची लोकसंख्या सुमारे ६० हजारांपर्यंत आहे. राजकीय व सामाजिक घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे गोपनीय कामकाज पोलीसपाटलांमार्फत होत असते. तसेच गावातील छोटे-मोठे तंटे सोडविण्याचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. मात्र, शासनाने पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याच्या कामात दिरंगाई केली आहे.कोथळी येथील पोलीसपाटील उत्तम तिवडे यांच्यावर सध्या प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या लोकसंख्येची गावे नेमून दिली आहेत. त्यामध्ये दानोळी २० हजार, उदगाव २२ हजार, कोथळी १२ हजार, उमळवाड ८ हजार या गावांतील जबाबदारी त्यांच्यावर आहे. या चार गावांचे पोलीसपाटीलकी करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून त्यांना एका कोथळी गावाचे मानधन मिळते व यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उदगांव, दानोळी ही गावे मोठी असून या गावात स्वतंत्र पोलीसपाटील पद भरणे गरजेचे आहे. एकाच पोलीसपाटलांमुळे चार गावांतील छोटे-मोठे तंटे मिटविण्यासाठी भेटी देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणारे तंटे रौद्ररूपधारक केल्यानंतरच पोलीस ठाण्याला समजते. त्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील तरुणांना नोकरीच्या कामासाठी लागणारा वर्तणुकीचा दाखला, घातपाताची नोंद, पंचनामे व विविध दाखले यासाठी तीन गावांतील नागरिकांना कोथळी पोलीसपाटील तिवडे किंवा जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जावे लागते. (प्रतिनिधी) संवेदनशील गावेदानोळी हे संवेदनशील गाव असून याठिकाणी वारंवार वादावादीचे प्रकार घडत असतात, तर उदगाव येथेही वाळूच्या कारणामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या दोन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणेअंतर्गत उदगाव व दानोळी येथे पोलीस चौकीची गरज आहे.