शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल हवामानामुळे कस्तुरी कॅम्प चारवरून परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : तौक्ते व यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अनंत अडचणींवर मात करीत कोल्हापूरची वीस वर्षीय कस्तुरी सावेकरने अगदी कमी ...

कोल्हापूर : तौक्ते व यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अनंत अडचणींवर मात करीत कोल्हापूरची वीस वर्षीय कस्तुरी सावेकरने अगदी कमी वयात एव्हरेस्टची लढाई जिंकली आहे. ताशी १८५ कि.मी.वेगाने वाहणारे वारे, हिमवर्षाव आणि एकूणच प्रतिकूल हवामानामुळे कॅम्प चारवरून तिला परतावे लागले. मात्र, इतक्या उंचीपर्यंत एव्हरेस्टला गवसणी घालणारी ती पहिली करवीरकन्या ठरली आहे. अशी माहिती तिचे वडील दीपक सावेकर व कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अमर अडके यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कस्तुरीच्या रुपाने कोल्हापुरात मिशन एव्हरेस्ट ही मोहीम व्यापक केली जाणार आहे. पदभ्रमंती, गिर्यारोहणातील नवोदितांना तिच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा निर्णय यानिमित्त घेण्यात आला. जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करून आपल्या कवेत घेण्यासाठी कस्तुरीने दोन वर्षे खडतर तयारी केली होती. गेल्या वर्षी तिची कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे मोहीम थांबली. त्यानंतर दुसरी लाटेतही अनेक अडचणींवर मात करीत ती १४ मार्चला एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली. नियोजित मोहिमेनुसार २६ मे तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला असता, पण त्यापूर्वीच तौक्ते व यास या दोन वादळामुळे एव्हरेस्टवर मोठ्या प्रमाणात वारे आणि हिमवर्षाव झाला. त्यातूनही तिने जिद्द न हारता तेथेच काही दिवस इतर गिर्यारोहक व शेर्पांसह संकटांना तोंड देत वेदर विन्डो मिळण्यासाठी मुक्काम केला. पण तिच्या सुरक्षिततेच्या कारणावास्तव पिंक प्रमोशन व स्थानिक प्रशासनाने कॅम्प चारवरून तिला माघारी येण्याची सूचना तिला व तिच्यासह इतर गिर्यारोहकांना केली. या कालावधीत ती कॅम्प चारवरून तीनवर आणि पुन्हा कॅम्प दोनवर खाली आली. तेथेही अनेक संकटांना सामना करावा लागला. केवळ निसर्गाच्या रौद्ररुपामुळे तिला या मोहिमेतून माघार घ्यावी लागली. येत्या २०२२ ला पुन्हा ती एव्हरेस्ट सर करेल, असा विश्वासही या दोघांनी व्यक्त केला.

यावेळी करवीर हायकर्सचे अरविंद कुलकर्णी, कस्तुरीची आई मंजू सावेकर, प्रशिक्षक आनंदा डाकरे, उदय निचिते, विजय मोरे, विना मालदीकर, दिनकर कांबळे, विश्वनाथ भोसले, डाॅ. दीपक आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

शेर्पांमुळे मोहिमेतून माघार

तिने पुन्हा एव्हरेस्टवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील शेर्पांनी वातावरणामुळे येण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा तिला माघार घ्यावी लागली. ती एव्हरेस्टच्या कॅम्प दोनवर तीन, तर कॅम्प दोन वर पाच दिवस मुक्काम केला. या काळात विचार न करू शकणाऱ्या अडचणींना तिला तोंड द्यावे लागले, अशीही माहिती सावेकर, डाॅ. अडके यांनी दिली.