शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

योग्य किमतीसाठी दुहेरी कर हवा

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

बुधाजीराव मुळीक : इतिहास विभागाच्या ‘शेती विकास’ चर्चासत्राला प्रारंभ

कोल्हापूर : शेतीला केंद्रस्थानी ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेची आणि धोरणांची फेरमांडणी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनांची योग्य किंमत देण्यासाठी दुहेरी दर आकारणीचे धोरण आपल्याला आज ना उद्या स्वीकारावे लागेल. शेतीला प्राधान्य दिल्याखेरीज भारताला भवितव्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी येथे केले. कार्यक्रम संपल्यानंतर वृत्तवाहिनीवर संवाद साधताना डॉ. मुळीक यांनी, शेतकऱ्यांनी आता आत्महत्या नव्हे, तर त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची हत्या केली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे आयोजित ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शेतीविकास’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील शेती : काल, आज व उद्या’ असा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील होते.डॉ. मुळीक म्हणाले, हरित, धवल, नीलक्रांती आणि हॉर्टिकल्चरद्वारे सप्तरंगी क्रांती अशा टप्प्यांनी शेतीचा विकास झाला. मात्र, हे क्षेत्र असंघटित राहिल्याने शेती व्यवसाय मागे पडला. शेती हा प्रत्येक घटकाचा आधार आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. ते झाले नाही तर आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची शेतकऱ्यांनी हत्या केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. मुळीक यांनी व्यक्त केली.डॉ. पाटील म्हणाले, ज्ञान, संपत्ती आणि प्रसिद्धी ही प्रगतीच्या मोजमापाची भौतिक साधने आहेत; पण प्रगतीचे खरे मोजमाप मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीतून अधोरेखित होते. त्या दृष्टिकोनातूनच शेतीकडे पाहण्याची गरज आहे. यावेळी डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, आदी उपस्थित होते. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एम. ए. लोहार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘रोबोटिक्स’ हे शेतीचे भवितव्य‘रोबोटिक्स’ हे भारतीय शेतीचे भवितव्य असणार आहे. प्रीसिजन फार्मिंगद्वारे प्रत्येक रोप हे युनिट मानून त्याला द्यावयाच्या खतांची, पाण्याची मात्रा निश्चित केली जाईल. जनावरांची धार यंत्रमानव काढतील. या सर्व गोष्टींसाठी आपली मानसिक, सामाजिक आणि राजकीय मनोभूमिका स्वीकारार्ह बनविण्याची गरज आहे, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले.