शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

बावड्यातील ६०० एकरांतील ऊस वाळणार : शेतकऱ्यांना करावी लागणार स्वत:ची ‘पाण्याची स्कीम’

रमेश पाटील- कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र ‘एसटीपी’ नुकतेच सुरू झाल्याने जुना ‘एसटीपी’ बंद करण्यात आला आहे. परिणामी या सांडपाण्यावर १९७४ पासून उसाचे पीक घेणाऱ्या कसबा बावडा, कदमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचा ६०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस पाणी बंद झाल्यामुळे वाळत चालला आहे. भविष्यात या ठिकाणी ऊस पिकवायचा झाल्यास शेतकऱ्यांना स्वत:ची पाण्याची सोय करावी लागणार असल्याची स्थिती आहे. अचानक सांडपाणी देण्याचे महापालिकेने बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.शहरातील जयंती नाला व कोल्हापूर शहराचे पूर्ण सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणले जाते. १९७४ पासून ते आजतागायत या केंद्रातून फारशी प्रक्रिया न केलेले पाणी शेतकरी आपल्या उसाला देत होते. या दूषित पाण्यामुळे उसाचे तसेच अन्य इतर पिकांचे उत्पन्न कमी मिळत असे; परंतु दूषित का असेना परंतु पाणी मिळते म्हणून शेतकरी हे पाणी पिकाला देत होते. महापालिकेने दूषित पाणी शेतकरी घेतात म्हणून या पाण्याच्या भरवशावर श्रीराम सेवा संस्थेने धरणावरील या क्षेत्राची पाणीपुरवठा स्कीम बंद केली. या भागातील विहिरीचे नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाले आहेत.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुरू झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे.प्रक्रिया केंद्रातील पाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याचे बंद झाल्याने बावड्यातील अनेक शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. कारण सांडपाणी बंद झाल्याने अचानक नवीन कोणतीही पाण्याची योजना लगेचच राबवता येणार नाही. केर्लेकर मळा, सरकारी मळा, जामदार मळा, कदमवाडी, बिरंजे पाणंद, वेटाळे मळा, रेडेकर पाणंद, ठोंबरे मळा, प्रिन्स शिवाजी शाळेशेजारील परिसर आदी ठिकाणच्या ऊस क्षेत्रासाठी या सांडपाण्याचा उपयोग शेतकरी करत होते; परंतु आता पाणी पुरवठाच बंद झाल्याने ऊस वाळून जाणार आहे.शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करावीकसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे जुना एसटीपी सुरू करता येणार नाही. शेतीला पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभी करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी महापालिका घेत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिकाआयुक्तांना बावड्यातील शेतकरी भेटणारशेतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी मिळावे, म्हणून लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. - रवींद्र रेडेकर, शेतकरी, कसबा बावडा