शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

वाळवे खुर्दचा डॉक्टर ट्रॅक्टरच्या धडकेत ठार

By admin | Updated: December 26, 2016 00:57 IST

इस्पुर्लीतील रुग्णवाहिकेवरील आरोग्य अधिकारी

कोल्हापूर : इस्पुर्ली (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात डॉ. रविराज विश्वनाथ आसबे (वय ३०, रा. वाळवे खुर्द, ता. कागल) हे ठार झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचा मृत्यू झाला होता.डॉ. रविराज आसबे हे इस्पुर्ली येथील १०८ रुग्णवाहिकेवर आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता जेवणाचा डबा आणण्यासाठी पेट्रोल पंपाजवळील हॉटेलमध्ये निघाले होते. त्यावेळी गारगोटीकडे जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी धडक होऊन त्यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नागरिकांनी सीपीआरमध्ये आणले. परंतु, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व वाळवेतील मित्रपरिवाराने सीपीआर परिसरात गर्दी केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व चार महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. त्यांचे वडील विश्वनाथ आसबे जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवत्ती घेतली आहे. डॉ. आसबे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.