शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावचा दुष्काळ रस्ता पुन्हा उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

यड्राव : येथील दुष्काळ रस्ता निकृष्ट दर्जामुळे एक वर्षात दोनदा उखडला असल्याने या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार झाली आहे. ...

यड्राव : येथील दुष्काळ रस्ता निकृष्ट दर्जामुळे एक वर्षात दोनदा उखडला असल्याने या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार झाली आहे. असे असतानाही प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने व ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यड्राव येथील शेतवडीकडे जाणाऱ्या जांभळी हायस्कूल ते घाट मळा या दरम्यान असणाऱ्या दुष्काळ रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार हा रस्ता तत्कालीन जि. प. बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्या फंडातून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा माजी आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाला होता. परंतु, हा रस्ता ठेकेदाराने खडीकरण व मुरुमीकरण करून पूर्ण केले आहे. या रस्त्यासाठी १० लाख रुपये निधी मंजुरीतून ६० मीटर खडीकरण आणि मुरुमीकरण करण्यात आले आहे. हे कामही ठेकेदाराकडून दर्जेदार झाले नसलेने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्याने व ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने ऑक्टोबरमध्ये ठेकेदाराने या मार्गावर मुरूम टाकून रोलिंग केले होते. हा रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर असतानाही या मार्गावर ठेकेदाराने मनमानी करून मुरुमीकरणाचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने पुन्हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे या रस्त्यावरून शेतवडीकडे जाणे अत्यंत गैरसोयीचे व धोकादायक बनले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कोट - या दुष्काळी रस्त्यावर खडीकरण व मुरुमीकरण केले, तरीसुद्धा काही दिवसांत तो कायमच उखडला जातो. हा कायमचा त्रास सोडविण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली असता, त्यांनी हा रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.

- रमेश माने, शेतकरी यड्राव

फोटो - ३१०५२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथील शेतवडीकडे जाणारा दुष्काळ रस्ता पुन्हा उखडल्याने शेतकरी बांधवांना ये-जा करणे अडचणीचे व धोकादायक बनले आहे.