शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दुष्काळी भाग ढबूकडे, पण दराने मोडले कंबरडे

By admin | Updated: September 20, 2015 23:27 IST

उत्पादनात वाढ : दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच; बाजारातील आवक वाढली

गजानन पाटील -- संख---डाळिंब, द्राक्षे व इतर भाजीपाला पिकांऐवजी कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ढबू मिरची उत्पादनाकडे वाढला आहे. हे अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने बाजारात मोठी आवक झाल्याने ढबू मिरचीचा दर दहा रुपयांपर्यंत घसरला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे. औषधे, खते, मशागतीचा खर्च, मजूर यांचा खर्च वजा जाता, उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कोणतीही पिके न करता विहीर, कूपनलिकेतील पाण्यावर ढबू मिरचीची लागण केलेली आहे. बाजारात गेल्या चार वर्षापासून दर चांगला मिळाला आहे. पारंपरिक पिके न घेता नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन देणारी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या दावण्या, बिब्ब्या या रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष, डाळिंब फळबागा धोक्यात आल्या आहेत. बेदाण्याला योग्य दर मिळत नाही. द्राक्षाचा उत्पादन खर्च वाढला. पण दर तोच राहिल्याने द्राक्षशेती न परवडणारी बनली आहे. त्यामुळे शेतकरी इतर भाजीपाला पिकाकडे वळला आहे.तालुक्यातील रामपूर, सोन्याळ, दरीकोणूर, कोळगिरी, खलाटी, माडग्याळ, जत, शेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब आदी पिकांच्या शेतीला पर्याय म्हणून ढबू मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. इंदिरा, आयेशा, इंडस या जातीच्या ढबू मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रोहिणी हंगामात ढबू मिरचीची लागण केली जाते. पाच महिन्यांमध्ये उत्पादन येते. अनुकूल वातावरणामुळे चांगले उत्पादन आले आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी सेंद्रीय, रासायनिक खते, महागड्या औषधांचा वापर केला आहे. चांगली दर्जेदार व गुणकारी अशी बायो ३०३ आर, केवर कवच, आॅट्रा, जंप आदी महागड्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले आहे. एक एकर ढबूची लागण करण्यासाठी मल्चिंग पेपर, ठिंबक संच, तार, बांबूच्या काठ्या, बेड मारणे, बांधणी, सुतळी याचा दीड लाखापर्यंत खर्च येतो. तसेच मजूर, महागडी औषधे, सेंद्रीय व रासायनिक खते यांचा सुमारे एक लाखापर्यंत खर्च जातो. असा एकरास अडीच लाख रुपये खर्च येतो. मात्र आता मिळणारा ढबूचा दर पाहता, ढबू उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. माल पॅकिंग करून पाठविला जातो. साधारणत: ३० किलोचा बॉक्स असतो. हा माल मुंबई, पुणे, दिल्ली, बेळगाव, नागपूर, कोलकाता, जबलपूर आदी ठिकाणी ट्रान्स्पोर्टमार्फत पाठविला जातो.शेतकऱ्यांनी हिमतीने भरघोस उत्पादन आणले आहे. पण बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दराची घसरण झालेली आहे. गेल्या चार वर्षातील हा सर्वात नीचांकी दर आहे. जुलैमध्ये २० रुपये किलो असणारा दर आता ९ रुपयांवर आला आहे. १ ते ८ आॅगस्टपर्यंत २० रुपये, ८ ते ११ आॅगस्टपर्यंत १९ रुपये, १९ ते २१ आॅगस्ट १२, २१ ते २८ आॅगस्टअखेर ९ रुपये, १ ते १५ सप्टेंबरअखेर १० ते १२ रुपये प्रति किलो असा दर घसरला आहे. बॉक्स पॅकिंग, मजूर, मशागती, वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्याच्या हाती ४ ते ५ रुपये येतात.यावर्षी मोठ्या कष्टाने, मेहनतीने ढबू मिरचीचे भरघोस उत्पादन आणले आहे. उन्हाळ्यात इतर कोणतेही पीक न करता ढबू मिरची केली आहे. उभारणीसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. शेवटपर्यंत असाच दर मिळाला, तर जेमतेम पैसे मिळणार आहेत. खर्च पण निघणार नाही. कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.- अशोक मिसाळ, ढबू उत्पादक शेतकरी, दरीकोणूरपाकिस्तानात निर्यातबंदीढबू मिरचीची निर्यात पाकिस्तानलाही केली जाते. मात्र पाकिस्तान व भारत यांच्यातील बैठक फिसकटल्याने आॅगस्टपासून भारत व पाकिस्तान यांच्यात निर्यातबंदी आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नाही. याचा फटकाही ढबू उत्पादकांना बसला आहे, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.