शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिटी सर्व्हेचा सर्व्हर डाऊन; कामकाज ठप्प

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

कर्मचारी घेतात बसून पगार : दोन आठवडे नागरिक मारताहेत हेलपाटे; वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर

कोल्हापूर : ‘आंधळी प्रजा आणि दळभद्री राजा’ असल्यास राज्याचा कारभार कसा होईल, हे काही वेगळे सांगायला नको. कारभारात केवळ सुंदोपसुंदीच निर्माण होईल. अगदी असाच कारभार गेल्या दोन आठवड्यांपासून येथील सिटी सर्व्हे कार्यालयात सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी रजेवर, संगणक प्रिंटर खराब, सर्व्हर डाऊन अशा विविध कारणांनी येथील कामकाज ठप्प असल्याने येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, परंतु याचे सोयरसुतक नसलेले कर्मचारी ‘तांत्रिक’कारण देत निवांत बसून पगार घेत आहेत. भाऊसिंगजी रस्त्यावर असलेले सिटी सर्व्हे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. प्रॉपर्टीकार्डच्या नकला, मोजणीच्या नोंदी अशा कारणांनी नेहमी या कार्यालयाशी नागरिकांचा संपर्क येत असतो, परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कार्यालयातील कामकाज संगणकावर होत आहे. त्यामुळे कामात गती आली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत संगणकाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. प्रिंटर खराब झाला आहे. सर्व्हर डाऊन झाला आहे, पण हे काम तातडीने पूर्ण करून घेणे कार्यालय प्रमुखांची जबाबदारी असतानाही त्यांनी ती नीट पार पाडलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात एन.आय.सी. विभागाकडे तक्रार करून तातडीने सर्व्हरमधील दोष दूर करणे आवश्यक होते, परंतु या कार्यालयातून तोंडी तक्रार करण्यात आली होती. एन.आय.सी.मधील अधिकारी कर्मचारी सतत दौऱ्यावर राहिल्याने या तक्रारीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. नवीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांची कामे तातडीने झाली पाहिजेत यासाठी सेवाधिकाराच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सध्या तरी सर्वच शासकीय कार्यालयांत नागरिकांना हेलपाटे मारावे लागतच आहेत. (प्रतिनिधी)मंगळवारी या कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल विचारणा केली असता येथील अधिकारी सुवर्णा पाटील यांनी आपण गेल्या दहा दिवसांत रजेवर असल्याच्या मुदतीत ही गैरसोय झाल्याचे सांगितले. श्रीमती पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन तातडीने आजच्या आज सर्व्हरचा प्रश्न सुटला पाहिजे आणि तोपर्यंत झेरॉक्स मारून नागरिकांना दाखले द्या, अशा सक्त सूचना दिल्या तसेच मी रजेवर असताना तुम्ही काहीच का हालचाली केल्या नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सहकाऱ्यांची कानउघाडणी केली.