शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी मजुरांसाठी सुरक्षा विम्याची रक्कम दुप्पट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

कोल्हापूर: राज्य शासनाने लागू केलेल्या गोपीनाथ मुंडे सामाजिक सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपुऱ्या सुविधांमुळे ऊस तोडणी मजुरांना अनेक हालअपेष्टांना सामोरे ...

कोल्हापूर: राज्य शासनाने लागू केलेल्या गोपीनाथ मुंडे सामाजिक सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपुऱ्या सुविधांमुळे ऊस तोडणी मजुरांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. अपघात, झोपडी, मेडिकल या विम्यासाठीची कार्यकक्षा दुपटीने वाढविण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी सरकारने आदेश जारी करावेत, अशी मागणी राजर्षी शाहू ऊस तोडणी कामगार मार्गदर्शन व साहाय्यता केंद्राने केली आहे.

ऊस तोडणी कामगारांच्या सुरक्षेसाठी म्हणून सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे, पण त्याचा लाभ फारच कमी मिळत असल्याने मजुरांना प्रत्येक गोष्टीसाठी पदरमोड करावी लागत आहे. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने यात वाढ होणे अपेक्षित होते, पण सरकार व कारखानदार या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

मजूर रहात असलेल्या झोपड्यांमध्ये साधी लाईटचीही सोय नसते, पाणी लांबून आणावे लागते. या झोपड्या आग अथवा अन्य कारणाने नुकसानग्रस्त झाल्या, तर त्यांना ७ हजारांचा विमा हप्ता मिळतो, पण तो १५ हजार करण्याची गरज आहे. मजुरांचा कारखान्यांकडून तीन लाखांचा विमा उतरवला जातो. तथापी मजूर हा कुटुंबप्रमुख असल्याने त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या देखील जास्त असल्याने ही रक्कम ५ लाख करण्याची गरज आहे.

बैल विम्याबाबतीत दुजाभाव केला गेला आहे. बैल मृत्युमुखी पडल्यास ३७ हजार ५०० रुपये जास्तीत-जास्त मिळतात. प्रचलित बाजारभावानुसार एका बैलाची किंमत ६० ते ७० हजाराच्या घरात असते. बैल मृत्युमुखी पडल्यास नवा बैल घेणे ३७ हजारांत शक्य होत नाही. पुन्हा मजूराला स्वत:कडचे पैसे घालावे लागतात. त्याला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत हा खर्च त्याला पेलवणारा नाही. मेडिकल विम्याचीही रक्कम ३० हजार मिळते, पण ती १ लाख रुपये करण्याची गरज आहे. कारण औषधे व शस्त्रक्रियेचा खर्च वाढला असल्याने ३० हजारांत संपूर्ण उपचार खर्च भागवता येत नाही.

ज्या परिस्थितीत ऊसतोडणी मजूर काम करतात, ते पाहता त्यांच्या सुरक्षिततेकडे शासनाने सहानुभूतीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. शासनाने तातडीने पुढाकार घेऊन संबंधित साखर कारखाने व सहसंचालकांना योग्य ते निर्देश द्यावेत

टी. एस. कांबळे, अध्यक्ष, राजर्षी शाहू ऊस तोडणी कामगार मार्गदर्शन व साहाय्यता केंद्र, कोल्हापूर