शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अपरिपक्व, प्रसिद्धीसाठी बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना पत्रकातून केली.

मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले, मुरगूड शहरवासीयांना व माता-भगिनींना पाण्यासाठी दाही दिशा फरपट करायला लावणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशीच राधानगरी धरणावर जाऊन तेथील पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रक मुरगुडच्या कार्यकर्त्यांनी काढले होते.

जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये चौथ्या पातळीवर असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत. अशी परवानगी दिली तर त्यांच्या नोकऱ्या जातील, हे माहीत असल्यामुळे मुद्दाम परवानगी मागायची. परवानगी मिळणार नाही, हे माहीत असल्यामुळे स्टंटबाजी करायची. त्यानंतर ही परवानगी कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नाही, अशीच सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची. अशा बालिश बुद्धीच्या सल्लागारांचा सल्ला ऐकून अशी कृती करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका.

परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. त्यांच्या संकटामध्ये धावून जाऊन त्यांना दिलासा देऊया. विकासकामे करण्याची तर अशी सुवर्णसंधी आली आहे, विकासकामे अशी करूया की जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. अतिशय विनयाने जनतेला विश्वास देऊया. जनतेने नाकारलेल्यांना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच उथळपणाने बालिश व अपरिपक्व कृती केले जाते. नशीब आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले नाही; फक्त वंदनच केले गेले. उच्च न्यायालयात धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव -गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या पाण्याचे दर्शन लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करून घेऊ, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

गोमूत्र शिंपडणारे माझे कार्यकर्ते असणार नाहीत

राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून त्याना प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दम देत जनता सर्व ओळखून असते. जनता फार हुशार आहे, म्हणूनच २५ वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यांचा आदर करूया, असा सल्लाही मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला.