शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीचा ठोका १०० डेसिबलवर

By admin | Updated: September 30, 2015 00:36 IST

‘प्रदूषण नियंत्रण’चा अहवाल : विसर्जन मिरवणुकीत कारवाईला न जुमानता ध्वनिप्रदूषण

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी शहरात डॉल्बीच्या दणदणाटाने ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा तोडल्या. या दिवशी १०१ डेसिबलवर आवाज राहिल्याने मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ‘प्रदूषण’ मंडळास डॉल्बी लावणाऱ्यांवर थेट कारवाईचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अहवाल प्रसिद्ध करून कारवाईसंबंधी ‘हात’ वर केले आहेत. परिणामी, कारवाईला न जुमानता मंडळांनी लावलेल्या डॉल्बीमुळे ध्वनिप्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ध्वनिप्रदूषण नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात ७५, व्यापारी भागात ६५, रहिवाशी परिसरात ५५, शांतता म्हणून घोषित केलेल्या आवारात ५० डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजारामपुरी आठव्या गल्लीत, अंबाबाई मंदिर, खासबाग मैदान या ठिकाणी ध्वनिमापक यंत्रे बसविली आहेत. ही सर्व यंत्रे औद्योगिक क्षेत्र वगळून इतर परिसरात आहेत. त्यांवर नोंदविलेल्या अहवालावरून आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. शहरात यंदा नोंदणीकृत ५७९ गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली होती. त्यातील मोठ्या मंडळांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत कानठळ्या बसतील, अशा आवाजात डॉल्बी लावला. पोलिसांसमोर डॉल्बीचा हा दणदणाट सुरूच राहिला. यंदाच्या गणेशोत्सवास महापालिका निवडणुकीची झालर असल्याने अगोदर पोलिसांकडे ‘आम्ही डॉल्बी लावणार नाही,’ अशी हमी दिलेले प्रत्यक्षात मात्र डॉल्बी लावण्यात आघाडीवर राहिले. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा अधिकच आवाज राहिला. रुग्णालये असलेल्या ठिकाणीही डॉल्बीचा आवाज कमी नव्हता, हेही अहवालावरून स्पष्ट होते.