शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डॉक्टरची कारागृहात रवानगी

By admin | Updated: January 11, 2016 01:09 IST

अश्लील चित्रफीत : दोषारोपपत्र सादर

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याप्रकरणी डॉक्टर फणीकुमार किरण कोटा (वय ३१, रा. गंगारेड्डी, तेलंगणा) याला शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी तपास पूर्ण करून डॉ. कोटा याच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मनीषा गभाले यांनी रविवारी दिली. गुरुवारी (दि. ७) ड्युटी संपवून आल्यानंतर संबंधित महिला डॉक्टर आपल्या रूममध्ये कॉटवर विश्रांती घेत असताना चोरून मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याचे आढळून आले. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने डॉ. फणीकुमार याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ त्याच्या मुसक्या आवळत मोबाईल जप्त केला. यावेळी त्याची तपासणी केली असता पीडित डॉक्टर महिलेची झोपलेल्या अवस्थेतील छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप आढळली. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली.कोटा याला काढून टाकण्याची प्रक्रिया संशयित आरोपी फणीकुमार कोटा हा जिल्हा रुग्णालयात (सीपीआर) प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे. त्याच्या या कृत्याबद्दल पीडित महिला डॉक्टरने महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार डॉ. कोटा याला नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.