शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पवारांपेक्षा स्वत:ला मोठे समजता का; सतेज पाटील यांची धनंजय महाडिकांना विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:56 IST

कोल्हापूर : गेली पाच वर्षे प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करणारे खासदार धनंजय महाडिक हे स्वत:ला पक्षाध्यक्ष शरद पवार ...

कोल्हापूर : गेली पाच वर्षे प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करणारे खासदार धनंजय महाडिक हे स्वत:ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? अशी विचारणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली. वाटेल तेव्हा वाटेल त्या पद्धतीने वागण्याच्या प्रवृत्तीला कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेने हद्दपार करायचे ठरविले आहे, याची जाणीव झाल्यानेच आपण हतबल व अस्वस्थ झाला असल्याचा टोला या पत्रात त्यांनी लगावला आहे.दोन दिवसांपूर्वीच खासदार महाडिक यांनी पक्षविरोधी भूमिका घेणारे आमदार पाटील हे स्वत:ला राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे समजतात काय, अशी विचारणा केली होती. त्यास या पत्रकाद्वारे त्यांनी प्रत्युत्तर दिले.आमदार पाटील म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून गेल्या निवडणुकीत तुम्ही विजय मिळविला; पण त्यानंतर सगळे पक्ष आपल्याच खिशात आहेत, आम्ही कसेही वागू, अशी तुमची अहंकारी भाषा होती. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, त्याचबरोबर विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली. तुम्ही ज्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहात त्या पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांचा जाहीर प्रचार कोणत्या निवडणुकीत केला, याचे एकतरी उदाहरण दाखवून द्या. याउलट राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम केले. महानगरपालिका निवडणुकीत धर्मसंकट आहे म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार न करता परदेशात गेल्याचे सांगितले; पण प्रत्यक्षात रुईकर कॉलनीतील भाजप आमदार भावाच्या कार्यालयात बसून काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी जोडण्या लावल्या.काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही सक्रिय होता. तुम्ही पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्या कार्यकर्त्याला एखाद्या ठिकाणी पदाधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले हे जरा आठवून सांगा. याउलट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांच्या स्थायी सभापती निवडीवेळी आपल्या बंगल्यात बैठक घेऊन त्यांच्या पराभवासाठी रणनीती आखली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष राजू लाटकर हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असताना तुमच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सदर बझार येथे आलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यावेळी तुम्ही का लक्ष घातले नाही? या सर्व गोष्टी करताना तुम्ही राष्ट्रवादी पक्षापेक्षा मोठे होता का, असेही या पत्रकात म्हटले आहे.