शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अडचणी वाढवू नका

By admin | Updated: September 21, 2014 01:24 IST

‘दक्षिण’चे राजकारण : पी. एन. पाटील यांचा महादेवराव महाडिक यांना सल्ला

कोल्हापूर : तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात. मुलगा काँग्रेसचाच जिल्हा परिषदेचा सदस्य आहे. तोंडावर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासह (गोकुळ) राजाराम कारखान्याची निवडणूक आहे. वर्षभरात विधान परिषदेचीही निवडणूक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून अमल महाडिक यांच्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपची उमेदवारी घेतल्यास ते अडचणीचे ठरेल, त्यामुळे राजकीय अडचणी वाढवू नका, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आज, शनिवारी आमदार महादेवराव महाडिक यांना दिला. महाडिक यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एकमेकांच्या राजकीय अडचणी वाढवू नयेत, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सांगण्यात येईल व त्यांची जबाबदारी आम्ही पक्षातील प्रमुख नेतेमंडळी घ्यायला तयार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) ताराबाई पार्कातील कार्यालयात या दोघाच नेत्यांची सकाळी साडेदहाच्या सुमारास बंद खोलीत तासभर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीवेळी आमदार महाडिक यांनी पी. एन. यांची दोनवेळा भेट घेऊन पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देऊन पाटील यांनी धनंजय महाडिक यांना करवीर मतदारसंघातून निर्णायक मताधिक्य दिले. आता स्वत:ही पी. एन. पाटील हे करवीर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेव्हा त्यासाठी सहकार्य, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या घडामोडी व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाडिक गटाची भूमिका या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पी. एन. यांनी जिल्ह्यातील संभाव्य राजकीय स्थितीचा आलेख मांडला. महाडिक यांचा मुलगा अमल हा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तसे झाल्यास आमदार महाडिक व काँग्रेससमोरीलही अडचणी वाढू शकतात, हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. चुका दुरुस्त करून काँग्रेस म्हणून एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाऊया, असे पी. एन. यांनी महाडिक यांना सूचविले. त्यांनी त्याला प्रतिसाद देत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या राजकारणाबद्दल त्यांनी तक्रार केली. त्यावर पी. एन. यांनी सतेज पाटील यांच्याशी बोलणे झाले असून, काहीतरी तोडगा काढूया; पण काँग्रेसमध्येच एकमेकांशी भांडत बसण्याची ही वेळ नाही, असे स्पष्ट केले.