शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

परीक्षाकाळात पाल्यांना घराचा तुरुंग नको !

By admin | Updated: February 27, 2017 23:32 IST

अभ्यासाचा तणाव टाळावा : मोकळ्या वातावरणात वावरल्याने मुलांच्या मेंदूला चालना; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्षे आता युद्धसदृश भासू लागली आहेत. मुलांच्या करिअरची अतोनात काळजी करणाऱ्या काही पालकांनी तर एक महिन्यापासून त्यांच्या मुलांना घरात नजरकैदेत ठेवले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘गेलेली वेळ भरून येणार नाही’ असा गर्भित इशारा देऊन अक्षरश: मुलांचा मानसिक छळ सुरू केला आहे. परीक्षाकाळात मुलांच्या कलाने वागणं सर्वांसाठी हिताचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. संध्याकाळचा किमान एक ते दीड तास अभ्यासाव्यतिरिक्त मोकळ्या वातावरणात मुलांनी जाणं हे त्यांच्या मेंदूला चालना देणारे ठरते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुलांची परीक्षा जवळ आली की, टीव्ही बंद करणं, मुलांचे खेळ बंद करणं, त्याला घराबाहेर पडू न देणं, अशा गोष्टी पालकांकडून सर्रास केल्या जातात. यामुळे मुलांवर परीक्षांचा अनावश्यक ताण पडतो हे पालकांच्या लक्षातच येत नाही. संध्याकाळचा एक ते दीड तास त्यांनी अभ्यासाशिवाय घालवणं, मैदानी खेळ खेळणं यात काही गैर नाही उलट यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचा ताण हलका होत असेल तर त्यांना तसंही करू द्यावं. शिवाय नुसतं पडून त्यांना टीव्ही पाहावा, असं वाटत असेल तर तोही पाहू देण्याची मुभा पालकांनी विनाकटकट द्यावी. परीक्षेच्या काळात टीव्ही वगैरे बंद ठेवण्याची गरज नाही. फक्त त्यांना टीव्ही नेहमीपेक्षा मर्यादित काळापुरता पाहू द्यावा. घरात अभ्यासाशिवाय दुसरी काही चर्चाच नको, असं वातावरण ठेवू नये. तसेच नाष्ट्याच्या वेळेस, जेवणाच्या वेळेस हलक्या-फुलक्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारून वातावरणातील ताण निवळावा. एकूणच काय तर मुलांच्या परीक्षांच्या काळात घराचा तुरुंग होणार नाही याची दक्षता पालकांनी घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)काय करू नये !सकाळी उठल्याबरोबर परीक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपायचे सुचते, असं म्हणू नये. चहा-नाष्टा झाल्याबरोबर लगेच ‘चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा,’ असं म्हणणं टाळावं. जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता उठतो/उठते हे वारंवार सांगू नये. लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फीचा आकडा, आई-वडिलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर उठता-बसता सांगू नये. मुलगा/मुलगी टीव्ही समोर थोडा वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत. मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास ‘मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो,’ असं खोटं सांगू नये. थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.मुलांनी काय खावं, काय टाळावं?या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं. दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चारवेळा विभागून थोडं-थोडं खायला द्यावं. मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा. परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत द्यावं. परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल. प्रथिनं असलेला आहार मुलांना द्यावा.मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा किंवा दूध देऊ नये. त्याबरोबर फळे किंवा सुकामेवा द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी किंवा बिस्किटं पण चालतील. तसेच मुलं रात्री अकरानंतर जर अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते. मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताजं-ताजं मुलांना खायला द्यावं.परीक्षेचा काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावा. फळांचे ज्यूस देऊ नयेत त्यापेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची, सूचनांची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची, संवादाची गरज असते. तसेच आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसू नका. त्यांना प्रेमानं सहकार्य करा. त्यांच्यातील गुणांची, क्षमतांची, त्यांच्यातील ताकदीची त्याला जाण्