शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जातून टोलमुक्ती नकोच

By admin | Updated: April 15, 2015 00:43 IST

शहरवासीयांची प्रतिक्रिया : प्रकल्पाच्या घोटाळ्याची चौकशी करा

 कोल्हापूर : शहरातील सर्वच टोलनाक्यांवर आंदोलकांच्या धास्तीने कोल्हापूरकरांसाठी टोलमुक्ती कधीच सुरू झाली. आता २२० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी व्याजासह ४५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. महापालिकेवर पर्यायाने शहरवासीयांवर टोलच्या कर्जाचे ओझे देऊन ठेकेदाराची तुंबडी भरण्याचा हा उद्योग शहरवासीयांना अमान्य आहे. त्यामुळे शासनाने अनुदानातून टोलमुक्ती करावी; अन्यथा परिस्थिती ‘जैसे थे’च असू दे, असाच सूर शहरवासीयांसह सेवाभावी संस्था व टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांतून उमटत आहे. जुन्या शासनाने केलेली घाण निपटणे इतके सोपे नाही, हे कळते. शासनाने सर्वसामान्य माणसाच्या खिशात हात न घालता टोलमुक्ती करावी. जे करार चुकीचे झाले, याचे कर्तेधर्ते जे कोणी असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे. कराराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. जनतेवर कर्जाचा भार न टाकता इतर पर्यायांतून टोलची रक्कम सरकारने भरावी, असे मत कृती समितीचे सदस्य अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केले. कर्जरूपाने टोलचे पैसे भागवून टोलचा भार कोल्हापूरकरांवरच देण्याचा प्रयत्न म्हणजे टोलमुक्तीची ही घोषणाच फसवी व अभासी आहे. त्यामुळे ‘आयआरबी’स धार्जिणा असा हा निर्णय सरकारने बदलावा, यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई व बुरहान नायकवडी यांनी दिला आहे. जो प्रकल्प कोल्हापूरकरांनी नाकारला आहे, त्याचा भार पुन्हा कशासाठी टाकला जात आहे? ‘आयआरबी’ला तीन लाख चौरस मीटरचा मोठा भूखंड एक रुपया भाड्याने दिला आहे. त्याची किंमत ठरवावी. उर्वरित रकमेसाठी वाढीव एफएसआय द्यावा. या पैशातून टोलमुक्ती करावी, असा सल्ला कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिला. रस्ते प्रकल्पाचे पैसे भागविण्यासाठी कर्ज न देता अनुदान स्वरूपात द्यावेत, अशी मागणी बाबूराव कदम यांनी पक्षातर्फे केली.