शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जातून टोलमुक्ती नकोच

By admin | Updated: April 15, 2015 00:45 IST

शहरवासीयांची प्रतिक्रिया : प्रकल्पाच्या घोटाळ्याची चौकशी करा

शहरवासीयांची प्रतिक्रिया : प्रकल्पाच्या घोटाळ्याची चौकशी करा कोल्हापूर : शहरातील सर्वच टोलनाक्यांवर आंदोलकांच्या धास्तीने कोल्हापूरकरांसाठी टोलमुक्ती कधीच सुरू झाली. आता २२० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी व्याजासह ४५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. महापालिकेवर पर्यायाने शहरवासीयांवर टोलच्या कर्जाचे ओझे देऊन ठेकेदाराची तुंबडी भरण्याचा हा उद्योग शहरवासीयांना अमान्य आहे. त्यामुळे शासनाने अनुदानातून टोलमुक्ती करावी; अन्यथा परिस्थिती ‘जैसे थे’च असू दे, असाच सूर शहरवासीयांसह सेवाभावी संस्था व टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांतून उमटत आहे. जुन्या शासनाने केलेली घाण निपटणे इतके सोपे नाही, हे कळते. शासनाने सर्वसामान्य माणसाच्या खिशात हात न घालता टोलमुक्ती करावी. जे करार चुकीचे झाले, याचे कर्तेधर्ते जे कोणी असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे. कराराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. जनतेवर कर्जाचा भार न टाकता इतर पर्यायांतून टोलची रक्कम सरकारने भरावी, असे मत कृती समितीचे सदस्य अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केले. कर्जरूपाने टोलचे पैसे भागवून टोलचा भार कोल्हापूरकरांवरच देण्याचा प्रयत्न म्हणजे टोलमुक्तीची ही घोषणाच फसवी व अभासी आहे. त्यामुळे ‘आयआरबी’स धार्जिणा असा हा निर्णय सरकारने बदलावा, यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई व बुरहान नायकवडी यांनी दिला आहे. जो प्रकल्प कोल्हापूरकरांनी नाकारला आहे, त्याचा भार पुन्हा कशासाठी टाकला जात आहे? ‘आयआरबी’ला तीन लाख चौरस मीटरचा मोठा भूखंड एक रुपया भाड्याने दिला आहे. त्याची किंमत ठरवावी. उर्वरित रकमेसाठी वाढीव एफएसआय द्यावा. या पैशातून टोलमुक्ती करावी, असा सल्ला कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिला. रस्ते प्रकल्पाचे पैसे भागविण्यासाठी कर्ज न देता अनुदान स्वरूपात द्यावेत, अशी मागणी बाबूराव कदम यांनी पक्षातर्फे केली.