शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘लिंकिंग’साठी अडवणूक नको

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

विवेक आगवणे : तातडीने ‘झिरो बॅलेन्स’ अकाऊंट उघडून द्या

कोल्हापूर : आधारकार्ड व बँक खाते क्रमांकाशी शिधापत्रिका लिंकिंग करण्याच्या कामात कोणीही दिरंगाई अथवा विलंब करू नये. कोणत्याही परिस्थितीत हे काम ३१ मार्चपर्यंत संपवायचे आहे. हे काम शासकीय असल्याने त्यात कोणी अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत बोलताना दिला. शिधापत्रिका आधारकार्ड व बँक खात्याशी लिंकिंग करण्याची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू असून, त्याच्या प्रबोधनासाठी शुक्रवारी येथील शाहू स्मारक भवनात महसूल कर्मचारी, रेशन दुकानदार, बँक अधिकारी, दुकानदार संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये आगवणे बोलत होते.शिधापत्रिका लिंकिंग करण्याचे काम सुरू असल्याने शहरातील कोणत्याही बॅँकेत कोणी नागरिक गेला आणि मला ‘झिरो बॅलेन्स’ खाते उघडायचे आहे, असे सांगितले तर संबंधित बँक अधिकाऱ्यांनी त्यास तत्काळ खाते उघडून द्यावे. जर ते देण्यास टाळाटाळ केली तर संबंधित बॅँकांविरोधात कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागेल. रेशनिंग दुकानदारांनी शिधापत्रिका लिंक करण्याचे काम ३१ मार्चच्या आत करायचे आहे. या कामात विलंब तसेच दोष राहू नयेत याची काळजी घ्यावी, असे आवाहन आगवणे यांनी केले.लिंकिंग योजनेमुळे नव्वद टक्के दुकानदार हवालदिल झाले आहेत. आपल्या अस्तित्वाचे काय, आपल्या फायद्याचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत; परंतु कोणीही हवालदिल न होता योजना यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन दुकानदार संघटनेचे चंद्रकांत यादव यांनी यावेळी केले. साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, अन्नधान्य वितरण अधिकारी डी. एम. सणगर यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी, दुकानदार उपस्थित होते. बैठकीतील सूचनाझिरो बॅलेन्स खाते उघडून देताना बँकांचा अडथळा खपवून घेणार नाहीबँक खाते उघडण्यासाठी आधारकार्डची सक्ती करू नयेपासबुकला उशीर लागणार असेल तर खातेदाराला अकौंट क्रमांक लिहून द्यावादुकानदारांनी आपल्या अस्तित्वाचे या मानसिकतेतून बाहेर पडावेशासकीय काम असल्याने अडथळा अथवा दिरंगाई केल्यास कारवाई