शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 01:01 IST

तात्यासाहेब मस्कर : कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचा कृतज्ञता सोहळा

कोल्हापूर : वीस टक्के अनुदानावर मी समाधानी नाही. तुम्हीदेखील राहू नका. पूर्ण अनुदान मिळविण्याच्या लढ्यासाठी एकी कायम ठेवल्यास निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यांनी रविवारी येथे केले.मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये समितीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील होते. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या १७ वर्षांच्या लढ्यास २० टक्के अनुदानाच्या माध्यमातून यश मिळाले. या लढ्यात सहकार्य केलेल्या संघटना, मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्ष मस्कर म्हणाले, विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिल्याने २० टक्के अनुदान मिळविण्यात यश आले. शिक्षणमंत्र्यांनी वाढीव अनुदान देण्याचा शब्द दिला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील म्हणाले, वीस टक्के अनुदानाबाबतचे यश सहजासहजी मिळालेले नाही. यात अनेकांचे योगदान आहे. पूर्ण अनुदानासाठीच्या कायदेशीर लढ्याला समिती, शिक्षकांनी तयार राहावे. समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, शंभर टक्के अनुदान मिळविण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी नियमांच्या चाकोरीत राहून गुणवत्ता टिकविण्यासह मराठी शाळा वाचविण्यासाठी कार्यरत राहा. समितीतर्फे आता ४० टक्के अनुदानासाठी लवकरच लढा सुरू केला जाईल.यानंतर दादा लाड, एस. डी. लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, लेखाधिकारी वैभव राऊत, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी भीमराव टोणपे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, मुख्याध्यापक संघ विनाअनुदान समितीचे अध्यक्ष एस. एम. पाटील, विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, शिवाजी खापणे, जनार्दन दिंडे, जयंत आसगावकर, भरत रसाळे, एस. एन. मस्कर, राजेश वरक, के. के. पाटील, आदी उपस्थित होते. मच्छिंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजू मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राम कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांकडून बुलेटया कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष मस्कर यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांना बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतर्फे ‘बुलेट’ प्रदान करण्यात आली. तिची चावी जगदाळे यांना वैजनाथ चाटे, संतराम मुंडे, विकास टेकाळे यांच्या हस्ते देण्यात आली.