शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीवेळी तरुणीला चक्कर

By admin | Updated: June 17, 2014 01:45 IST

रिक्त २७३ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलामध्ये रिक्त २७३ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे. शारीरिक चाचणी परीक्षेदरम्यान आज, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक एक तरुणी चक्कर येऊन पडल्याने पोलिसांनी तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस जीपमधून तिला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. मंजूषा आण्णाप्पा बरकाळे (वय १९, रा. मुरगूड) असे तिचे नाव आहे. पोलीस शिपाई पदांसाठी शारीरिक पात्रता चाचणी सुरू आहे. त्यासाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी घेतली जाते. ही चाचणी सुरू होती. १४ मिनिटांत ३ किलोमीटर अंतर पार केलेल्या मंजूषा बरकाळे हिला अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह सहकाऱ्यांची धांदल उडाली. राज्यात सर्वत्र पोलीस भरती सुरू आहे. परवाच विक्रोळी मुंबई येथे भरती प्रक्रियेवेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कोल्हापूर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली होती. (प्रतिनिधी)