शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

विविध कार्यक्रमांचे आयोजन : कागल, जयसिंगपूर, कुरुंदवाड येथे दुग्धाभिषेक, जलाभिषेक

कोल्हापूर : जिल्ह्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कागल नगरपरिषदेच्यावतीने बस स्थानक चौकातील छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यास सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि कागलचे पाटील बाळ पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.नगरपालिका आवारात छ. शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बस स्थानक येथील पुर्णाकृती पुतळ्यास दुधाचा अभिषेक तसेच जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी शिवाजीराव पाटील, नगरसेवक संजय चितारी, आशाकाकी माने, रंजना सणगर, सुमन कुऱ्हाडे, शिवसेनेचे राहुल घोरपडे, राष्ट्रवादीच्या आशाताई जगदाळे, मराठा सेवा संघाचे किरण मुळीक, इरफान मुजावर, जावेद नाईक, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंगपूर : स्वराज्य क्रांती जनआंदोलनाच्यावतीने जयसिंगपूर नगरपालिका सभागृहात शिवराज्याभिषेक सोहळा घेण्यात आला़ खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी नगराध्यक्षा अलका खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ आदम मुजावर, सागर माने, राजू चौगुले, देवदत्त चौगुले, सूरज भोसले, मिलिंद भिडे, शंकर नाळे, चंद्रकांत जाधव, रघुनाथ देशिंगे, रमेश शिंदे, साजिदा घोरी, वासू भोजणे, राजू दार्इंगडे, अब्दुल बागवान उपस्थित होते़ कुरुंदवाड : येथील शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला़ येथील नृसिंहवाडी रस्त्याला असलेल्या शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक घालण्यासाठी शहरासह शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, हेरवाड, आदी ग्रामीण भागातील शिवभक्त सकाळी आठच्या सुमारास मोठ्या संख्येने उपस्थित होते़ प्रारंभी येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या साहाय्याने शिवाजी महाराजांचा पुतळा पाण्याने स्वच्छ करण्यात आला़ त्यानंतर दुग्धाभिषेक घालण्यात आला़ यावेळी शिवभक्तांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला़ शिवभक्तांच्यावतीने दुधाचे वाटप करण्यात आले़ यावेळी कुरुंदवाडसह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कोडोली : येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील शिवाजी चौकातील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्यास सरपंच विद्यानंद पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपसरपंच नितीन कापरे, रमेश मेनकर, विलास भीमराव पाटील, जयदीप पाटील, अजिंक्य पाटील, धीरज पाटील, भीमराव पाटील, आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी )