शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारणार

By admin | Updated: February 19, 2017 00:47 IST

२७० कोटींच्या नोटा : नाबार्ड पडताळणीत संपूर्ण ‘केवायसी’ पूर्तता

कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या तब्बल २७० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाबार्डने ५० हजारांपेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ पडताळणी केली. यामध्ये सगळ्या खात्यांची पूर्तता झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बॅँकेत पडून असलेले पैसे बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत जिल्हा बॅँकेच्या १९१ शाखांत तब्बल २७० कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार दोन लाखांपेक्षा जास्त जमा झालेल्या खात्यांची यापूर्वीच तपासणी नाबार्डने केली होती; पण स्वीकारलेले पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने काहीशी असमर्थता दर्शविल्याने जिल्हा बँकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने ५० हजारांपेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बॅँकेने नाबार्डच्या माध्यमातून सोमवारपासून ‘केवायसी’ची पडताळणी केली. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांच्यासह सहा सदस्यांनी शुक्रवारी पडताळणीचे काम पूर्ण करून शनिवारी एकत्रित अहवाल तयार केला. येत्या दोन-तीन दिवसांत २७० कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया रिझर्व्ह बॅँकेकडून सुरू होईल. नाबार्डने कशी केली पडताळणी५० हजार रुपयांपेक्षा अधिक जमा असलेली खातीप्रत्येक शाखेतील ७५ खात्यांची केली पडताळणी३ हजार व्यक्तिगत, तर एक हजार संस्था खात्यांचा समावेश रोज साडेतीन लाखांचे नुकसानजिल्हा बॅँकेत २७० कोटी रुपये ८ नोव्हेंबरपासून पडून आहेत. सेव्हिंगचे व्याज गृहीत धरले तर रोज साडेतीन लाखांचा फटका बॅँकेला बसला आहे. त्यामुळे या रकमेबाबत लवकर निर्णय होणे बॅँकेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आॅनलाईन अहवालनाबार्डच्या पडताळणीचा अहवाल शनिवारी दुपारीच पुणे कार्यालयाला आॅनलाईन पाठविला जाणार होता; पण पोर्टल बंद पडल्याने रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी तो पाठविला जाणार आहे. पुणे कार्यालयाकडून मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे अहवाल सादर केला जाणार असून, तेथून रिझर्व्ह बँकेकडे पाठविला जाणार आहे. नाबार्डने ‘केवायसी’ पडताळणी केली. शंभर टक्के पूर्तता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लवकरच जुन्या नोटा बदलून मिळतील. - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक