शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक : चौकशी रद्दसाठी साकडे

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

१५७ कोटींचा गैरव्यवहार : मुंबईत सहकारमंत्र्यांसमोर संचालकांची सुनावणी

सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या १५७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेली चौकशी रद्द करावी, असे साकडे माजी संचालकांनी आज बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना घातले. पण सहकारमंत्र्यांनी संचालकांची ही मागणी अमान्य करीत म्हणणे मांडण्यासाठी आणखी एक संधी संचालकांना दिली. गेल्या पंधरा वर्षांत संचालक मंडळाने २१ संस्थांना नियमबाह्य कर्जाचे वाटप केले, तर १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेडीचा लाभ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून शैलेश कोतमिरे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा गैरकारभार उजेडात आला होता. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेडीत ७ कोटी ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. कऱ्हाडचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी ४७ माजी संचालक व ३ कार्यकारी संचालकांना नोटिसा बजाविल्या होत्या. संचालकांकडून खुलासा मागविला होता. आज बुधवारी मुंबईत बॅँकेचे संचालक विलासराव शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, मोहनराव कदम, सिकंदर जमादार यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन चौकशी रद्दचे साकडे घातले. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हेही उपस्थित होते. विनातारण कर्जाचा ठपका अमान्य करीत बँकेने दिलेल्या कर्जाला तारण घेतले आहे. तसेच कर्जदार संस्थाची हमीही घेतली आहे. त्यांना वसुलीसाठी नोटिसाही बजाविल्या आहेत. त्यात लेखापरीक्षणानंतर पाच वर्षातील कारभाराचीच चौकशी करता येते, इथे मात्र दहा ते बारा वर्षांची चौकशी सुरू आहे. ती बेकायदेशीर असल्याचे म्हणणे संचालकांनी मांडले, तर अरविंद देशमुख यांनी चौकशी सुरू असून, संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)आणखी एक संधीसंचालकांनी चौकशी रद्दची मागणी केली असली, तरी सहकारमंत्र्यांनी ही प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत संचालकांनी आणखी एकदा आपले म्हणणे चौकशी अधिकाऱ्यांसमोर सादर करावे, अशी सूचना केली. त्यामुळे संचालकांना आणखी एक संधी मिळाली आहे.