शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आपटेनगर टाकीतून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी ‘ई’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा ‘ए’ वॉर्डातील पाच ते ...

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी ‘ई’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा ‘ए’ वॉर्डातील पाच ते सहा प्रभागांतील पाणीपुरवठा खंडित झाला. फुलेवाडी रिंगरोड येथे २७ इंची जलवाहिनीला अचानक गळती लागल्यामुळे सोमवारी दिवसभर आपटेनगर टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.

शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करण्याकरिता बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी पाण्याची टाकी येथे पाणी आणले आहे. तेथून एक जलवाहिनी रंकाळा टॉवर मार्ग टाकण्यात आली आहे, तर दुसरी फुलेवाडी रिंगरोडमार्गे आपटेनगर येथे आणली असून, आपटेनगर येथील टाकीत पाणी सोडले जाते. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता आपटेनगर टाकीकडे जाणारी जलवाहिनीला फुलेवाडी जकात नाक्याच्या समोर गळती सुरू झाली.

शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याच्या नेमक्या वेळीच ही गळती सुरू झाल्यामुळे त्या मार्गावरील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे सकाळी आपटेनगर टाकीला पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या सहा-सात प्रभागांना, तसेच शिवाजी पेठेच्या काही भागाला पाणी मिळाले नाही. नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीची गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. ज्या ठिकाणी गळती लागली तेथील आठ फुटांची जलवाहिनी कट करून नवीन जोडवी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरूच होते. त्यामुळे आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या प्रभागांना रात्रीपर्यंत पाणी मिळाले नाही. परंतु आज, मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्याच्या कसल्याच तक्रारी नव्हत्या, पण गेल्या आठ दिवसांत दोन वेळा शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.