शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रावर वकिलांना अवमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST

इचलकरंजी : लसीकरणासाठी आलेल्या वकिलांना अवमानास्पद वागणूक देत डॉक्टरांनी रांगेतून बाहेर काढले. हा प्रकार गावभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. ...

इचलकरंजी : लसीकरणासाठी आलेल्या वकिलांना अवमानास्पद वागणूक देत डॉक्टरांनी रांगेतून बाहेर काढले. हा प्रकार गावभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी संंबंधितांना योग्य त्या सूचना व समज देऊन त्यांचा लेखी माफीनामा इचलकरंजी बार असोसिएशनला द्यावा, अशी मागणी केली आहे.

पत्रात, जिल्हा न्यायाधीशांच्या सूचनेनुसार वकिलांना लसीकरण करणाची प्रक्रिया महिन्याभरापासून प्रलंबित आहे. त्यासाठी असोसिएशनकडून नगरपालिकेस लसीकरणासाठी यादी दिलेली असून, स्वतंत्र कॅम्प घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार काही वकील बुधवारी आरोग्य केंद्रात गेले. त्यावेळी अधिकारी डॉ. काटकर यांनी अवमानास्पद वागणूक देत वकिलांना रांगेतून बाहेर काढले. त्यावेळी न्यायालयाचा सही-शिक्का असलेला विहित नमुन्यातील अर्ज त्यांना दाखविण्यात आला असतानाही उद्धटपणाची वागणूक मिळाली. ही बाब गंभीर असून, संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना व समज द्यावी. तसेच त्यांच्याकडून लेखी माफीनामा असोसिएशनला पाठविण्याचा आदेश द्यावा, असे नमूद केले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक तांबे व सचिव अ‍ॅड. विशाल जाधव, अ‍ॅड. इसाक समडोळे व प्रवीण फगरे उपस्थित होते.