शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वळवाच्या हुलकावणीने मशागती खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:55 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी २५ मे रोजी ‘रोहिणी’ नक्षत्रावर होणारा पेरा अडचणीत आला आहे. यंदा २ लाख ५७ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.जिल्ह्यात खरिपासाठी ४ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असते. त्यात पिकांच्या फेरपालटीमुळे थोडेफार कमीअधिक होते. गेल्यावर्षी मे महिन्यापर्यंत तीन-चार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मशागत चांगल्या झाल्या होत्या. ‘रोहिणी’ नक्षत्रात बहुतांशी धूळवाफ पेरण्या झाल्या होत्या. भाताचे १ लाख १० हजार ५३७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते, त्यापैकी १ लाख ८ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्य, भुईमूग व सोयाबीनच्या पेरण्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या होत्या; पण मृग नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने सलग तीन महिने झोडपून काढल्याने ज्वारीच्या पेरण्यांवर परिणाम झाला. पावसाने उघडीपच न दिल्याने ज्वारीचे ६३३९ हेक्टरपैकी केवळ २९१६ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. त्यामुळे भात व नागलीच्या रोप लागणीचे क्षेत्र वाढले. सर्वांत कमी पेरणी हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत झाली.गेल्या वर्षीच्या पावसाचा अंदाज गृहीत धरून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असली, तरी वळीव पाऊस नसल्याने मशागतीला अडचणी येत आहेत. रब्बीची पिके काढून शिवारे मोकळी झाली आहेत. शेणखत विस्कटून नांगरटीच्या दोन-तीन पाळ्या झाल्या की रान पेरणीसाठी लगेच हाताखाली येते; पण वळीव पाऊसच नसल्याने अनेक ठिकाणी नांगरटी खोळंबल्या आहेत. २५ मे रोजी रात्री ८.२५ वाजता सूर्य ‘रोहिणी’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. साधारणता ‘रोहिणी’चा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. येत्या आठ दिवसांत वळवाने हजेरी लावली तरी पेरण्या वेळेत होतील. गेल्या वर्षी मृगानंतर एकसारखी पावसाने सुरुवात केली असली तरी धूळवाफ कमी होऊन रोप लागण वाढली. तरीही गत वर्षी २ लाख ५० हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा खरीप क्षेत्रात ७ हजार हेक्टरने वाढ झाली असून, २ लाख ५७ हजार हेक्टर पेरक्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भाताचे १ लाख १० हजार हेक्टर आहे. कडधान्याचे ८०० हेक्टर असून भूईमूग ५२ हजार, तर सोयाबीन ५३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे.पाखाळ्यांकडे शेतकºयांच्या नजराजोतिबाची चैत्र यात्रा झाली की त्या पुढील पाच रविवारी होणाºया पाखाळणीला हमखास पाऊस लागतोच, हा इतिहास आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा प्रत्येक पाखाळण्याकडे होत्या; पण यंदा पाचही पाखाळण्या कोरड्या गेल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.उसाचे १.४०लाख हेक्टर क्षेत्रजिल्'ात उसाचे १ लाख ४० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. गत वर्षी १०० टक्के उसाची लागण झाली. यंदाही तेवढ्याच क्षेत्रात उसाची लागवड केली आहे.शेतकºयांची धाकधूक वाढलीत्यात यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज दिल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथेच भात, सोयाबीनच्या पेरणीची धाडस शेतकरी करणार आहे. उर्वरित ठिकाणी पावसाचा अंदाज बघूनच पेरणी करेल.पीक पेर क्षेत्रभात १,१०,५००ज्वारी ५,१००नागली २१,५००मका २,७००तूर २,३००मूग १,८००उडीद १,६००भुईमूग ५२,९०१सोयाबीन ५३,५००ऊस १,४०,७००एकूण ३,९२,६०१