शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

चर्चेतील मुलाखत : भास्करराव पेरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. निवडणुकीत साम, ...

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड या नीतीचा सर्रास वापर होतो. कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळतो. मात्र सत्ता आल्यानंतर विकास कामात ती इर्षा दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही वाड्या-वस्त्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. ग्रामीण विकासासाठी स्थानिक नेत्यांसह सदस्यांनी कोणती भूमिका घेऊन ग्रामपंचायतींमध्ये जावे, याबाबत पाटोदा (जि. औरंगाबाद) चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी साधलेला संवाद.....

प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटाेळे करू नये : भास्करराव पेरे-पाटील

भावकी, जात, धर्माच्या आधारे निवडणुका होऊ नयेत : विकासाची दृष्टी, अभ्यासू असणाऱ्यांनाच मतदारांनी निवडून द्यावे

प्रश्न : पाटोदा गावच्या विकासाचे सूत्र काय आहे?

उत्तर : पाटोदा आदर्श करण्यासाठी मी काय जादूची कांडी वापरली नाही. ग्रामस्थांच्या खूप कमी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून असतात. आपण मूलभूत सुविधांची वेळेत पूर्तता केली की लोक समाधानी राहतात. त्याशिवाय खूप करण्यासारखे असते, तशी दृष्टी ठेवून आपण वाटचाल केली, तर महाराष्ट्रातील सर्वच गावे ‘पाटोदा’ होण्यास वेळ लागणार नाही.

प्रश्न ; महाराष्ट्रातील अनेक गावेही आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत?

उत्तर : ही वस्तुस्थिती आहे. अर्ध्या महाराष्ट्रात पाणी नाही, पाण्याबरोबर अनेक गावे रस्त्याविना चाचपडत पुढे जाताना पाहून खूप वेदना होतात. दोेष कोणाला द्यायचा? दोष देत बसण्यापेक्षा ग्रामपंचायतींने सक्षमपणे विकासाचा आराखडा तयार करून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती पाहिजे. ती असेल, तर गावाला विकासापासून कोणी रोखू शकत नाही.

प्रश्न : शासन कोट्यवधीचा निधी ग्रामस्तरावर देते, मग खेडी विकासाऐवजी भकास कशी?

उत्तर : आईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करीत असते. सेवा-सुविधा पुरवित असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकत आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शासनाच्या ग्रामपंचायतीसाठी अनेक योजना आहेत. मात्र यामधील किती योजना आपल्याला माहिती आहेत. जात, धर्म यामधून जे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ते आपण अजून मिटवू शकलो नाही. ते प्रश्न जैसे थे असताना, दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मग खेडी भकास होणार नाही तर काय होणार.

प्रश्न : ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत, इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळते?

उत्तर : माझ्या मते ज्याला गावासाठी वेळ देता येतो, त्यांनीच निवडणुकीला उभे रहावे. प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटोळे करू नये, विकासाची दृष्टी असणाऱ्यांनीच जनतेसमोर मते मागण्यासाठी जावे.

प्रश्न : नवीन येणाऱ्या सरपंच व सदस्यांना आपण काय सांगाल?

उत्तर : रस्ते, गटारी, पाणी या मूलभूत गरजांची पूर्तता सगळ्यांनाच करावी लागते, किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे. त्याशिवाय खूप करण्यासारखे आहे. गाव सर्वांगीण कसे समृध्द होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय निधी योग्य ठिकाणी आणि दर्जेदारपणे खर्च झाला पाहिजे. जिथे विकास कामात आर्थिक स्वार्थ गुंतला आहे, तिथे कागदावरच विकास दिसतो. सरपंच व सदस्यांनी हे प्रकर्षाने टाळावे, यासाठीच ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगले आहे, जे वेळ देऊ शकतात, त्यांनीच ग्रामपंचायतीमध्ये यावे, असे सांगत असतो.

प्रश्न : आपण पाटोळेचा कायापालट करण्यासाठी विकासनिधी कसा आणला?

उत्तर : ग्रामपंचायतीला खूप निधी येतो. पैशाची कमतरता अजिबात नाही. अलीकडे तर थेट ग्रामपंचायतींना निधी येतो. फक्त त्याचे नियोजन व्यवस्थित करून शंभर टक्के खर्च करण्याची मानसिकता आपली हवी.

प्रश्न : निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय आवाहन कराल?

उत्तर : ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका.

दडपशाहीने बिनविरोधपेक्षा निवडणूकच बरी

गावच्या भल्यासाठी चार माणसे बसून गावातील अंतर्गत विरोध मिटवत असतील व ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी. ही निवडणूक निकोप असावी. गावाच्या भल्यासाठी कोणी झटू पाहत असेल तर अशा होतकरू व्यक्तीला जात, भावकी, धर्म विसरून ग्रामस्थांनी साथ द्यायला हवी, असे आवाहन पेरे-पाटील यांनी केले.