शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

महापालिकेत घोडेबाजाराची चर्चा

By admin | Updated: December 12, 2015 00:59 IST

नगरसेवकांची पुन्हा एकदा दिवाळी : निवडणुकीतील चुरशीमुळे अनेकांना भाव

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घोडेबाजार संपविण्याचा विडा उचललेल्या राजकारण्यांनाच आता घोडेबाजाराला प्रोत्साहन देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेवर पाठवायच्या एक जागेसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत असून त्यानिमित्ताने हा घोडेबाजार होऊ घातला असून नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत २५ ते ५० लाख रुपये खर्च करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या दृष्टीने ही नामी संधी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १ नोव्हेंबरला झाली. निवडून आलेल्या बहुतेक सर्वच नगरसेवकांनी साधारणपणे २५ ते ५० लाख रुपये खर्च करून निवडून आले आहेत. कोणी पक्षाच्या फंडावर निवडणूक लढविली तर कोणी आपल्याजवळील पैसे खर्च कले. काहींनी तर चक्क पाच टक्के व्याजाने खासगी सावकारांकडून कर्जे घेऊन निवडणूक लढविली होती. त्यामुळे निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून काहीजण आर्थिक अडचणीत तर काही नगरसेवक कर्जबाजारी झाले आहेत. महानगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर झाली असली आणि महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करावे लागले असले तरी असली बंधने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत नसल्याने तो एक ताण (टेन्शन) कमी झाले आहे. सध्या प्रत्येक जण राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काय निरोप मिळतो, कोणाची कितीची आॅफर येते याबाबतची उत्कंठा तर सर्वांनाच लागून राहिली आहे.विधान परिषदेची निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे, असा जरी व्हीप निघाला तरी निवडणुकीचे मतदान हे कागदी मतपत्रिकेद्वारे आणि गोपनीय पद्धतीने होणार असल्याने संधी साधण्याचा मोका मिळणार आहे म्हणून नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदानाला येणार आहे, यापेक्षा तो गुप्त पद्धतीने कोणाला मतदान करणार हे शेवटपर्यंत गोपनीयच राहणार आहे. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून काही नगरसेवकांनी आतापासूनच मध्यस्थ नेमण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. २५ लाखांचा दर निघण्याची शक्यता गतनिवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांना जिल्हा बॅँकेचे संचालक व माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी आव्हान दिले होते. त्यावेळच्या निवडणुकीत कमीत कमी दहा व जास्तीत जास्त पंधरा लाख असा एका मताचा दर निश्चित झाला होता आणि मतदानासाठी आले एका बाजूने आणि मतदान मात्र उलट्या बाजूने करण्यात आल्याचा प्रकारही घडला होता.यंदा तर आमदार महाडिक यांची लढत माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत होत असून, ही लढत अत्यंत काटाजोड आणि भल्या-भल्यांचे राजकीय अंदाज चुकविणारी आहे. कोण निवडून येणार हे सांगणे तसे महाकठीण आहे. त्यामुळे यंदा हाच दर एका मतासाठी कमीत कमी २५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात तो आणखी फुगण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शिवाय आठ ते दहा दिवसांची सहलही होणार असल्याने नगरसेवक सध्या खूश आहेत. फक्त प्रतीक्षा आहे, ती कोण किती देणार याची !महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करावे लागले तसे बंधने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत नसल्याने तो एक ताण (टेन्शन) कमी झाला आहे. त्यामुळे आता कोण ‘जास्त’ देणार त्याला मतदान अशी भूमिका काहींची दिसते.