शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 15, 2014 23:20 IST

मुक्त विद्यापीठ : शासनाच्या घटनाबाह्य कारभाराची पुष्टी

शिवाजी सावंत -गारगोटी -मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री शिप नाकारुन शासनाने घटनाबाह्य कारभाराची पुष्टी केल्याचे कृतीतून सिद्ध केले असून मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.घरचे अठराविश्व दारिद्र्य त्यामुळे नोकरी अथवा कोठे तरी काम करावे लागते. पण शिक्षण घेण्याची अनिवार इच्छाशक्ती काम करताना शिक्षणाची कवाडे शोधत असतात हे चित्र आहे दीनदलित मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांचे. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी मुक्त विद्यापीठ व दूरशिक्षण पद्धती अस्तित्वात आली. विद्यापाठातून भटके-विमुक्त, जाती-जमाती, आर्थिक दुर्बल घटक, महिला अशा समाजातील वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश घेत असतो. मुळातच या प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण व समाजापासून दूर आहे. अशा या प्रवाहाबाहेरील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण करणे, त्यांना सुविधा देणे आवश्यक असताना त्यांची स्कॉलरशिप, फ्री शिप नाकारुन शासन त्यांना प्रवाहाबाहेर ढकलण्यासाठी जाणीवपूर्व प्रयत्न करीत आहे का? असे या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.मुक्त विद्यापीठांच्या कोल्हापूर विभागाचा विचार करता शैक्षणिक साल २०१३-१४ या वर्षात २१ हजार ४८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर संपूर्ण राज्यात मुक्त विद्यापीठाच्या दहा विभागात दोन ते अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व त्यांच्यापुढील पिढीचा विचार करून शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन या विद्यार्थ्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, अन्यथा अडीच लाख कुटुंबांवर वाताहतीची वेळ येईल. मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राचे संचालक डॉ. एस. एस. चौगले यांनी कोल्हापूर विभागाचे समाजकल्याण आयुक्त गायकवाड यांना अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी मधुकर बोरसे, यशवंत पाटील, विजयसिंह रजपूत, विश्वजित भोसले आदी उपस्थित होते.