शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपंग फिरस्त्याचा मृत्यू

By admin | Updated: December 20, 2015 01:45 IST

ताराबाई पार्कातील घटना : खून की दगडावर पडून मृत्यू ?

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील एका भिंतीच्या कुंपणालगत अपंग फिरस्त्याचा शनिवारी सकाळी दगडावर संशयास्पद मृतदेह आढळून आला. इस्माईल अमीर शेख (वय ७५, रा. कनाननगर झोपडपट्टी ,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. यामुळे ताराबाई पार्कात खून झाल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली; पण शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शेख यांचा दगडावर पडून मृत्यू झाल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कनाननगर झोपडपट्टीतील इस्माईल शेख हे ताराबाई पार्क परिसरात फिरून एका हॉटेलजवळच्या कुंपणानजीक असलेल्या भिंतीलगत गेल्या कित्येक वर्षांपासून राहत होते. शनिवारी सकाळी शेख यांचा कुंपणालगत असलेल्या झाडाजवळ दगडावर डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्राव झालेल्या अवस्थेतील मृतदेह नागरिकांना दिसला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. तत्काळ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत चौधरी यांनी नागरिकांकडे विचारणा केली. त्यावर नागरिकांनी इस्माईल शेख हे कनाननगर झोपडपट्टी येथे राहावयास असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कनाननगर येथे जाऊन इस्माईल यांची मुलगी मंगल आप्पासो घाटगे यांना कळविले. मंगल घटनास्थळी आल्या. त्यांनी मृतदेह ओळखला. पोलिसांनी घाटगे यांची फिर्याद घेतली. यानंतर पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात नेला. जप्त केला मोठा दगड इस्माईल शेख हे शुक्रवारी (दि. १८) रात्री लघुशंकेसाठी कुबड्या घेऊन उठले. झोपण्याच्या ठिकाणापासून १० ते १५ फूट असलेल्या झाडाजवळ त्यांनी लघुशंका केली. झाडाजवळ असलेल्या मोठ्या दगडावर शनिवारी सकाळी ते पडल्याचे दिसले, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर तपासासाठी हा दगड जप्त करून गाडीतून पोलिसांनी ‘सीपीआर’मध्ये आणला. शेख मूळचे गोकाकचे इस्माईल शेख हे मूळ गोकाकचे होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ते कनाननगर येथे राहत होते. रोज ते कनाननगर येथे घरी जेवण करून पुन्हा या भिंतीजवळ येऊन राहत असल्याचे कनाननगरमधील नागरिकांनी सांगितले.