शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

घाणीचे साम्राज्य,रस्त्यावर अतिक्रमण

By admin | Updated: January 2, 2015 00:19 IST

सार्वजनिक शौचालयांची वानवा : कत्तलखान्यामुळे सातत्याने चर्चेत, सांस्कृतिक सभागृहांचा अभावे

एका बाजूला झगमगीत कॉलनी अन् दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालयांची वानवा, जिकडेतिकडे घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवरची अतिक्रमणे अशा गर्तेत सदर बझार प्रभाग अडकला आहे. सदर बझार हौसिंग सोसायटी, निंबाळकर माळ, संजय गांधी हौसिंग सोसायटी, धरतीमाता हौसिंग सोसायटी, दादासाहेब गायकवाड हौसिंग सोसायटी, गौतम राजगृह हौसिंग सोसायटी आणि पत्रकारनगर असा व्यापक विस्तार असलेला हा प्रभाग येथील कत्तलखान्यामुळे सातत्याने चर्चेत असतो. सदर बझार चौक ते कोरगावकर हायस्कूल या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शाळांसमोरच कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यातील दुर्गंधी हे दृश्य किळसवाणे आहे. या घाणीमुळे अस्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. सदर बझाराचे प्रवेशद्वार असलेल्या निंबाळकर माळ ते कोरगावकर हायस्कूल या परिसरातील शौचालयांची दुरवस्था आहे. यांतील काही शौचालये मोडकळीस आली असून, त्यांची डागडुजी होत नसल्याची तक्रार १९२, ई वॉर्ड आणि निंबाळकरनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदर बझार हौसिंग सोसायटीमध्ये रिकाम्या जागेत नागरिकांनी झोपडपट्ट्या उभारलेल्या आहेत. जागेच्या अभावामुळे वैयक्तिक शौचालयाची उभारणी येथे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांशिवाय पर्याय नाही; पण आहे ती शौचालये तरी स्वच्छ ठेवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. रस्त्यावरची अतिक्रमणे, कचऱ्याचे ढीग, गटारींची सफाई या समस्या प्रामुख्याने जाणवतात. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी समाजमंदिराची गरज आहे; पण सदर बझार हौसिंग सोसायटी आणि ई वॉर्ड परिसरात समाजमंदिर नसल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध नाही. प्रॉपर्टी कार्डचे आश्वासन प्रत्येक नगरसेवकांनी गेल्या २० वर्षांत दिली आहेत; पण अद्यापही प्रॉपर्टी कार्डचा विषय प्रलंबित आहे. ई वॉर्डातील सुमारे ७१ घरांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय सोडविण्याचे आश्वासन दरवेळी नागरिकांना देण्यात आले; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही ७१ घरे महापालिकेच्या जागेत आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार आवश्यक आहे; पण असे होत नाही. हा गेल्या २० वर्षांचा अनुभव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. झोपडपट्टी परिसराबरोबरच अनेक कॉलनींमध्ये सांस्कृतिक सभागृहांची वानवा आहे. काही सोसायटींनी आपली जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेमध्ये सांस्कृतिक हॉल बांधून देण्याची मागणी कॉलनीतील नागरिकांमधूून व्यक्त होत आहे. उद्याचा प्रभाग : रूईकर कॉलनीप्रतिबिंब प्रभागाचेसंदीप खवळे