शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘थेट पाईपलाईन’ कोरडीच

By admin | Updated: June 30, 2014 00:51 IST

‘मलई’साठी नगरसेवकांत अस्वस्थता : नेत्यांनी थेट लक्ष घातल्याने गोची

संतोष पाटील ल्ल कोल्हापूरशहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प ‘ढपला संस्कृती’मुळे टीकेचा विषय ठरला. यानंतर वाढलेल्या दबावामुळे नेत्यांनी जातीने लक्ष देत, योजनेची सूत्रे हाती घेतली. यामुळेच काळम्मावाडी थेट पाईपलाईन ही मनपाच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना नगरसेवकांच्या दृष्टीने कोरडीच ठरणार आहे. एरर्व्ही गटारीच्या कामातही ‘अर्थ’ शोधणाऱ्या येथील यंत्रणेला नेत्यांच्या दबावामुळे योजनेवर शिक्कामोर्तब करावे लागत असल्याने हात चोळत बसण्याची वेळ आली आहे.टोल आंदोलनामुळे कधी नव्हे इतके नगरसेवकांसह जिल्ह्णातील दोन्ही मंत्रीही आरोपाचे शिकार बनले. १०८ कोटींची नगरोत्थान योजना, ७५ कोटींचे कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पावसाळी पाणी नियोजन योजना, ‘बीओटी’ तील घनकचरा व्यवस्थापन व अत्याधुनिक कत्तलखाना, आदी तब्बल एक हजार कोटींच्या योजना शहरात राबविण्यात येत आहेत. नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने या सर्व योजना आर्थिक तडजोडीत अडकल्या. प्रत्येकाने सोईप्रमाणे ‘अर्थ’ही शोधला. अधिकारी व नगरसेवकांच्या खाबूगिरीमुळे १०८ कोटींची ३८ कि.मी.ची अंतर्गत रस्त्यासाठीच्या योजनेचा तर अक्षरश: बोजवारा उडाला. टोलमुक्तीची घोषणा करून कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. थेट पाईपलाईन योजना अमलात न आल्यास निवडणूक न लढविण्याचा निर्धार मंत्री सतेज पाटील यांनी केला होता. त्यामुळे योजना मंजुरीपासून ती अमलात आणेपर्यंतची सर्व सूत्रे पाटील यांनी आपल्याच हाती ठेवली. योजनेच्या निविदा प्रक्रियेपासून राज्य व केंद्राचा निधी महापालिकेच्या खात्यावर जमा करण्यापर्यंत सर्व बाबींकडे मंत्री पाटील यांनी जातीने लक्ष दिले. योजना पारदर्शक राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनीही ‘ढपला’ संस्कृतीला योजनेच्या आसपास फिरकूही दिलेले नाही. योजनेची सर्व सूत्रे खुद्द नेत्यांनीच हाती घेतल्याने गटारीच्या कामातही ‘अर्थ’ शोधणाऱ्या यंत्रणेची गोची झाली आहे. पावणेपाचशे कोटींची योजना एक रुपाया न घेता मंजूर करण्याचे दु:ख अनेकांना सहन होईनासे झाले आहे. याबाबतची नाराजीही अनेकजण खासगीत व्यक्तही क रीत आहेत.