शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

मेहनतीने साकारला दूध व्यवसाय

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

८ गाई, ५० म्हशींचा प्रकल्प : शेगुणशी कुटुंब दररोज न्हाते दुधात

पहाटे पाचला सुरू झालेला त्यांचा दिवस रात्री नऊला संपतो. ८ गाई, ५० म्हशींसह घरातील सहा माणसांचे जणू एक कुटुंबच तयार झालंय. नूल (ता. गडहिंग्लज) येथील शेगुणशी कुटुंबात गोठा प्रकल्प राबवून दूध धंद्यात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे कष्ट, व्याप पाहून ‘गोकुळ’ने त्यांना ‘मायक्रोट्रेनिंग सेंटर’ मंजूर करून दिले. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील दूध उत्पादकांचे जणू हे मार्गदर्शनाचे केंद्रच बनले आहे.सुरेश मारुती शेगुणशी यांनी नूल येथे गोठा प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे आठ लाखांचे कर्ज घेतले. वडील मारुती यांनी पाच म्हशींवर सुरू केलेल्या या दूध व्यवसायात आता ६० म्हशी आहेत. पहाटे चार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनावरांना चारा दिला जातो. पशुखाद्य, मिनरल मिक्सर, सोडा, मीठ, ऊस, मका, गाजरगवत, कडबा असे खाद्य असते. जनावरे दररोज एकवेळा, तर गोठा दोन वेळा स्वच्छ करतात. मुऱ्हा, सांगोला, जाफराबादी जातींच्या म्हशी त्यांच्या गोठ्यात आहेत. स्वत: सुरेश, पत्नी सुरेखा, वडील मारुती, भाऊ सुभाष, भावजय कमल, आदींसह चार मुले या व्यवसायात कष्ट घेतात. सैन्य दलातून निवृत्त होऊन सुरेश या व्यवसायात स्थिरावलेत. दहावी पास असलेल्या सुरेखा यांची नॅशनल डेअरी डिव्हिजन बोर्डतर्फे ओरिसातील महिला शेतकऱ्यांना दूध धंद्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली होती.या कुटुंबाची धडपड व कष्ट पाहून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ने शेगुणशी डेअरी फार्मवर मायक्रोट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. दोन वर्षात २४५ दूध संस्थांमधील ९००० दूध उत्पादक जोडप्यांनी या सेंटरवर येऊन आदर्श दूध व्यवसाय व गोठा व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले आहे.नोकरदार व शेतकरी यांच्यातील राहणीमान, पैशांची बचत, वेळेचे नियोजन, जनावरांची निगा, गोठ्याची रचना, गोरण, पाणी-चारा व्यवस्थापन, औषधोपचार, मुक्तसंचार, स्वच्छता, जमा-खर्च, स्वच्छ दूध निर्मिती या विषयावर स्वत: सुरेश, सुरेखा मार्गदर्शन करतात. त्यासाठी मार्गदर्शन हॉलची रचना केली आहे. ‘गोकुळ’चे अरुणकुमार डोंगळे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, असि. मॅनेजर एम. एस. चौगुले, शिवपार्वती सह. दूध संस्था यांनी त्यांना याकामी प्रोत्साहित केले.- संजय थोरात ल्ल नूलपरदेशी शेतकऱ्यांच्या भेटीशेगुणशी हे प्रतिदिन १७० लिटर दूध उत्पादन घेतात. महिन्याकाठी त्यांना ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. ‘गोकुळ’चा आदर्श गोठा व्यवस्थापनाचा जिल्हा स्तरावरील दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे, तर शिवपार्वती दूध संस्थेत सलग दहा वर्षे सर्वाधिक दूध संकलनाचेबक्षीस मिळाले आहे. या सेंटरला अमेरिका व ब्राझील येथील शेतकऱ्यांनीही भेटी देऊन दूध व्यवसायाची सविस्तर माहिती घेतली आहे.‘लय भारी’ तास.....दूध धंदा हा महिलांवर अवलंबून असतो. कष्ट महिलेचे, दूध बिल मात्र पुरुषाच्या हाती, अशी अवस्था आहे. म्हणून येथील मायक्रोट्रेनिंग सेंटरवर दूध उत्पादक पती-पत्नीला प्रशिक्षण दिले जाते. त्यात पती-पत्नीने एकमेकांशी कसे बोलावे, वागावे, मुलांशी कसा संवाद साधावा, कामाचे नियोजन कसे करावे, याविषयी शेगुणशी मार्गदर्शन करतात. या तासाला ‘लय भारी’ असे नाव दिले आहे.