शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

समितीचे जिल्हाध्यक्ष अशितोष डोंगळे, शहराध्यक्ष यश साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या शिष्टमंडळाने शिष्यवृत्तीच्या मागण्यांबाबतचे निवेदन दिले. सहायक आयुक्त ...

समितीचे जिल्हाध्यक्ष अशितोष डोंगळे, शहराध्यक्ष यश साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या शिष्टमंडळाने शिष्यवृत्तीच्या मागण्यांबाबतचे निवेदन दिले. सहायक आयुक्त लोंढे यांनी शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी कुठल्याही कागदपत्रांसाठी अडविले जाणार नाही असे सांगितले.

--

प्राणी क्लेश प्रतिबंधकची आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची आढावा बैठक प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी जिल्ह्यात पशु अत्याचार निवारणाच्या २७ केसेस दाखल झाल्या असून, या निकाली काढण्यात आल्याचे सांगितले. डॉ. विनोद पवार यांनी प्राण्यांचे आजारपण, उपचार, लसीकरण, तसेच योजनांची माहिती १९६२ या टोल फ्री नंबरवर उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, शिक्षण अधिकारी प्राथमिक आशा उबाळे, मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

---

सोसायटीच्या बांधकामाचे उद्घाटन

कोल्हापूर : साने गुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेभोवती कंपाऊंड बांधकामाचे उद्घाटन काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते झाले. या जागेत ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना खेळण्यासाठी बागबगीचा करण्यात येणार आहे.

यावेळी चेअरमन सुधा जरग, व्हाईस चेअरमन प्रकाश आमते यांनी कॉन्ट्रॅक्टर रणजित कुंभार यांचा सत्कार केला. योळी संचालक पंडितराव पोवार, जितेंद्र मोरे, अश्विनी साळोखे, प्रकाश राऊळ, विलास कवडे, विश्वासराव जुवेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

--

कौशल्य विकासतर्फे ऑनलाईन जॉब फेअर

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १५ ते २० तारखेदरम्यान ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंटस हार्डवेअर नेटवर्किंग, डाटा प्रोसेसिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स अशी दहावी ते पदवीधर, पदव्युत्तर पात्रतेच्या उमेदवारांना जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये १४४ पेक्षा जास्त रिक्त जागांवर नोकरीची संधी मिळणार आहे. तरी इच्छुकांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थनावर आपला पसंतीक्रम व अर्ज नोंदवावा असे आवाहन करण्यात आहे.

---