शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

‘डाएट’कडून शिक्षकांना निव्वळ प्रशिक्षण, प्रत्यक्षात मूल्यमापन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

‘डाएट’कडून अध्यनस्तर निश्चितीचे काम केले जाते. शाळाभेटी, पर्यवेक्षण आणि चार टप्प्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. ...

‘डाएट’कडून अध्यनस्तर निश्चितीचे काम केले जाते. शाळाभेटी, पर्यवेक्षण आणि चार टप्प्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. शाळाभेटीनंतर शिक्षकांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या अध्यापनाबाबत काही सूचना केल्या जातात. नवीन शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. निवडश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन होत नाही. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन करण्याची यंत्रणाच नाही.

‘डाएट’ काय करते?

१) वर्गाध्यापन निरीक्षण, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अनुधावन

२) शैक्षणिक साहित्यांच्या वापराचे मूल्यमापन. विद्यार्थ्यांकडून होणार वापर, परिणामकारक वापर तपासणी.

३) शिक्षक अध्यापन, विद्यार्थी संपादणूक यावर आधारित शैक्षणिक संशोधन करून उपाययोजना सुचविणे.

४) शैक्षणिक परिषदांद्वारे मार्गदर्शन, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण व मूल्यमापन.

५) अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम निर्मिती, प्रभावी अंमलबजावणी.

प्रतिक्रिया

अध्यनस्तर निश्चितीसह चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन डाएट करते. गरजाआधारित, अध्यापनातील नवीन प्रवाहाबाबत आणि वेतनश्रेणीसाठीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येते.

-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट कोल्हापूर.

विद्यार्थी, पालक संघटनांचे पदाधिकारी काय म्हणतात?

देशातील आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आदी यंत्रणांचे मूल्यमापन, ऑडिट केले जाते. मग, शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होण्यास काय हरकत आहे. शिक्षकांनी स्वत:हून आमचे मूल्यमापन करावे असे शासनाला सांगावे. शासनाने शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापनासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्च अनुभव असलेल्या संस्थेची नियुक्ती करावी.

-रमेश मोरे, समन्वयक, शिक्षण वाचवा नागरी कृती समिती.

शिक्षकांच्या कामाचे बाह्य आणि अंतर्गत मूल्यमापन व्हावे. त्यातून त्यांची गुणवत्ता समजण्यास मदत होणार आहे. या मूल्यमापनातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काही नवीन उपक्रम राबविण्याची पाऊले शासनाला टाकता येतील.

-ऋतुराज माने, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती.

नवी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होते. त्यांना वेतनही चांगले आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांनी शिकविलेले विद्यार्थ्यांना कळते का? नाही हे शासनाला समजणे आवश्यक आहे.

-फिरोज सरगूर, सचिव, विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटना.

चौकट

नव्या धोरणात ‘डाएट’कडून प्रमाणीकरण

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या अध्यापनाच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी ‘डाएट’ या संस्थेवर असणार आहे. या धोरणातील शिक्षक शिक्षण विभागात त्याची नोंद आहे.